close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

परदेशात तिरंगा फडकवणारी अभिनेत्री वेधतेय सर्वांचं लक्ष

तिरंगा फडकवताना अभिमान व्यक्त करते टीव्ही अभिनेत्री...

Updated: Aug 19, 2019, 02:50 PM IST
परदेशात तिरंगा फडकवणारी अभिनेत्री वेधतेय सर्वांचं लक्ष

मुंबई : टीव्ही अभिनेत्री हिना खानने अमेरिकेत भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या परेडमध्ये उपस्थित होती. यावेळी ती पारंपरिक भारतीय वेशभूषेत पोहोचली होती. परदेशात न्यूयॉर्कमध्ये तिरंगा फडकवता तिने अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. 

फोटो शेअर करत हिना म्हणते की, 'आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे खुप आनंदाची गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही जगातील सर्वात सशक्त अशा देशात आपल्या भारत देशाचा झेंडा मोठ्या मानाने फडकवता तो क्षण फार आयुष्यातील फार महत्वाचा क्षण असतो.'

'ये रिश्ता क्या केहलाता हैं' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्रीच्या चर्चा कायम वाऱ्यासारख्या पसरत असतात. सध्या ती 'कसोटी जिंदगी की' मालिकेमध्ये 'कोमोलिका' ही व्यक्तीरेखा साकारताना दिसत आहे. 

त्याचबरोबर, ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपट निर्माते विक्रम भट्ट यांच्या 'हॅक' चित्रपटात भुमिका साकारण्यासाठी हिना सज्ज झाली आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सवातही हीनाने सर्वांची मनं जिंकली होती.