Fighter Teaser: श्वास रोखून धरायला लावणारा, ॲक्शनने भरलेल्या हृतिक-दीपिकाच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Hrithik Roshan- Deepika Padukone's Fighter Teaser Out : हृतिक आणि दीपिकाच्या 'फायटर' चा थरारक टीझर प्रदर्शित! एकदा पाहाच

दिक्षा पाटील | Updated: Dec 8, 2023, 12:13 PM IST
Fighter Teaser: श्वास रोखून धरायला लावणारा, ॲक्शनने भरलेल्या हृतिक-दीपिकाच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित title=
(Photo Credit : Social Media)

Hrithik Roshan- Deepika Padukone's Fighter Teaser Out : सिद्धार्थ आनंद आणि मार्फलिक्सचा एरियल ॲक्शन थ्रिलर 'फायटर' प्रदर्शित होण्याची सगळे आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. त्यात आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर कलाकार या चित्रपटात पाहायला मिळत आहेत. टीझरमध्ये अनिल कपूर यांची फक्त झलक पाहायला मिळाली आहे. भारतातील हवाई दलाची कहाणी आणि भारतीय लढाऊ विमानांसह चित्रित करण्यात आलेला आहे. 

'फायटर' या चित्रपटाचा टीझर हा 1 मिनिट 13 सेकंदाचा आहे. या 73 सेकंदाच्या टीझरमध्ये एरियल अॅक्शन पाहायला मिळत आहे. जो पाहताना तुम्हाला नक्की आश्चर्य होईल. चित्रपटातील एक-एक सीन हा तुम्हाला आश्चर्य चकीत करेल. या सगळ्या अॅक्शनसोबत चित्रपटातील बॅकग्राऊंड म्यूजिक आहे. जे ऐकत असताना हे सगळं दृष्य पाहणं एक्सायटिंग आहे. या चित्रपटात हृतिक आणि दीपिका हे स्क्वाड्रन लीडर झाले आहेत. तर अनिल कपूर ग्रुप कॅप्टन शमशेर पठानियाची भूमिका साकारत आहेत. अनिल कपूर चर्चेत येण्याचं कारण फक्त फायटर नाही तर रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट देखील आहे. 

हेही वाचा : 'मध्यरात्री माझी मुलगी थिएटरमधून निघाली अन्...', संसदेत महिला खासदारांची 'ॲनिमल' वर टीका

दरम्यान, 'फायटर' या चित्रपटाचं बजेट हे 250 कोटींचं असल्याचं म्हटलं जातं. तर हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या आधल्या दिवशी म्हणजेच 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. या आधी त्यांनी पठाण आणि वॉर या दोन्ही स्पाय चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सनं केली आहे. हा यशराज बॅनर खाली असलेला पाचवा स्पाय सिनेमा आहे. याआधी त्यांचे 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वॉर', 'पठाण' आणि 'टायगर 3' हे चार चित्रपट येऊन गेले आहेत. 

'फायटर' या चित्रपटाची पटकथा ही फायटर जेट्सच्या अवतीभोनती फिरते. सिद्धार्थ आनंदनं 2019 मध्ये 'वॉर' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यानंतर त्यानं 'पठाण' दिग्दर्शित केला. तर फायटर हा चित्रपट भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपट आहे. सिद्धार्थ आनंदविषयी बोलायचे झाले तर त्याला 'फायटर' कडून खूप आशा आहेत. या चित्रपटाची पटकथा ही रेमन छिब यांनी लिहिली आहे.