देसी लूकमध्ये काम करणाऱ्या 'इमली'च्या बोल्ड लूकनं सोशल मीडियाचा पार वाढला

इमली सीरियलमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीची हॉट फोटो...चाहते घायाळ

Updated: Sep 27, 2021, 07:26 PM IST
देसी लूकमध्ये काम करणाऱ्या 'इमली'च्या बोल्ड लूकनं सोशल मीडियाचा पार वाढला

मुंबई: इमली सीरियलमधून घराघरात पोहोचलेली इमली सर्वांनाच आवडते. तिने आपल्या भूमिकेमुळे चाहत्यांची मनं जिंकली आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री सुंबुल तौकीर खान इमली या सीरियलमध्ये मुख्य भूमिकेत आहे. या सीरियलमध्ये तिचा लूक एकदम साधा दाखवण्यात आला आहे. सुंबुलचे रिअल लाईफमधील फोटो पाहून सोशल मीडियाचा पार चांगलाच वाढला आहे. 

इमली फेम अभिनेत्री सुंबुल तौकीर खानने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. 

सोशल मीडियावर सक्रिय असलेले सुंबुल तौकीर खान अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिने शेअर केलेले फोटो पाहून रिअल लाईफमध्ये खूप मॉडर्न कपडे घालत असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. 

2 लाख लोक केवळ इंस्टाग्रामवर सुंबुल तौकीर खानला फॉलो करतात आणि अभिनेत्री कमेंट सेक्शन आणि तिच्या इन्स्टावरून चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत असते. ही मालिका टीआरपी लिस्टमध्ये पहिल्या 10 मध्ये आहे. या शोचे फॅन्स हा फोटो पाहून थक्क झाले आहेत. या फोटोंच्या निमित्ताने चाहत्यांना इमलीचं एक वेगळं रुप पाहायला मिळालं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sumbul Touqeer Khan (@sumbul_touqeer)