बिग बॉसच्या घरात अभिनेत्रीसोबत करण कुंद्राचा रोमान्स,बाहेर 'या' मुलीसोबत अफेअर?

करणच्या मनात तेजस्वी नाही, तर दुसरेच कोणीतरी आहे.

Updated: Nov 15, 2021, 05:21 PM IST
बिग बॉसच्या घरात अभिनेत्रीसोबत करण कुंद्राचा रोमान्स,बाहेर 'या' मुलीसोबत अफेअर? title=

मुंबई : बिग बॉस 15 फेम करण कुंद्रा आणि तेजस्वी यांचं फॅन फॉलोविंग झपाट्याने वाढत आहे. आता काही आठवड्यांपासून घरात दोघे एकमेकांच्या जवळ आलेले दिसत आहेत. त्यानंतर त्यांचे चाहते सोशल मीडियावर 'तेजरन' म्हणून या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. नुकताच करणबाबत एक मोठा खुलासा झाला आहे, तो म्हणजे करणच्या मनात तेजस्वी नाही, तर दुसरेच कोणीतरी आहे.

बिग बॉसमध्ये येण्याआधीच करण कुंद्रा दुसऱ्याच्या प्रेमात असल्याचे वृत्त आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, करण कुंद्रा आधीच त्याची दिल से दिल तक की अभिनेत्री योगिता बिहानीला डेट करत आहे.

अशा परिस्थितीत तो तेजस्वीसोबत पुन्हा काय करतोय, असा प्रश्न पडतो. घरात लव्ह अँगल निर्माण करण्यासाठी करण तेजस्वीच्या प्रेमात पडल्याचे नाटक करत आहे का? असा सवाल ही विचारला जात आहे.

Watch Karan Kundrra and Tejasswi Prakash romantic video Tejasswi Prakash  seat on his back during sleeping

एका को-स्टारला करतोय डेट 

करण कुंद्रानेच तेजस्वीसोबत घरात प्रेम सुरू केले. आता शोमधून काढून टाकलेल्या आकासा सिंगसोबतच्या संभाषणात त्याने आपल्या भावनांची कबुली दिली. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये तेजरान एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसले. शोमध्ये तेजस्वीने पहिल्यांदाच करणसमोर आपल्या मनातील गोष्टी सांगितल्या.

Image Source: Karan Kundrra Social media Page

चाहत्यांना विश्वास बसेना

करण कुंद्रा आणि त्याची पूर्वीची को-स्टार योगिता बिहानी यांनी दिलेल्या हिटनुसार, दोघेही दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. बातमी अशी आहे की दोघेही येत्या काही महिन्यात लग्न करणार आहेत.