मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि गायक फरहान अख्तरने अखेर त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. या जोडप्याच्या लग्नासाठी खंडाळ्याच्या फार्म हाऊसवर अत्यंत खाजगी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
लग्नानंतर या जोडप्याने कोर्टात लग्नाची नोंदणीही केली. आता फरहान अख्तर सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे न पाहिलेले काही फोटो शेअर करत आहे.
वऱ्हाडींसोबत फरहानची आई हनी इराणीही या फोटोंमध्ये दिसत आहे. तर आणखी एक फोटो समोर आला आहे. ज्यात फरहान अख्तर त्याच्या मुलींसोबत पोज देताना दिसत आहे. पण यावेळी शिबानी तिथे दिसत नाहीये.
फरहानने मुलगी शाक्या आणि अकिरासोबत फोटो क्लीक केले आहेत.फरहान अख्तरचं हे दुसरं लग्न आहे. याआधी त्याने अधुना भाभानीसोबत ( Adhuna Bhabani ) लग्नगाठ बांधली होती.
यावेळी तो 2 मुलींचा बाबा झाला. त्यानंतर तो शिबानी हिला डेट करुन लागला. गेल्या कित्येक वर्षांपासून दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत होते. अखेर दोघांनी कुटुंबियांच्या उपस्थित लग्न केलं आहे. या खास क्षणी फरहानच्या दोन्ही मुलींनी हजेरी लावली.
तर शिबानी यावेळी फरहान अख्तरचे वडिल जावेद अख्तर यांच्यासोबत डान्स करताना देखील दिसली. शिबानी यावेळी फरहानच्या फॅमिलीसोबत व्यस्त दिसली.
फरहान अख्तरच्या लग्नात त्याच्या मुलींनी खास फुगडी घातल्याचं पाहायला मिळालं. त्याचा फोटो फरहानने शेअर केला आहे. पण या सोहळयात शिबानी आणि फरहान यांनी एकत्र पहिल्या पत्नीच्या मुलींसोबत खास फोटो न काढल्याचं बोललं जात आहे.त्यामुळे देखील एकच चर्चा होतं आहे.
पहिल्या पत्नींच्या मुलींसोबत शिबानीचं बॉण्डिंग कसं आहे याबाबत देखील जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.