अक्षय कुमारच्या 'या' चित्रपटातून ईशा अंबानी येणार बॉलिवूडमध्ये

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीच्या घरी यंदा लग्नाची जोरदार तयारी सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच अंबानी कुटुंबीयांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाची घोषणा केली. त्यापाठोपाठ मुकेश आणि नीता अंबानीची मुलगी ईशादेखील विवाहबंधनात अडकणार असल्याची आज माहिती देण्यात आली आहे.  

Updated: May 6, 2018, 08:52 PM IST
अक्षय कुमारच्या 'या' चित्रपटातून ईशा अंबानी येणार बॉलिवूडमध्ये  title=

 मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीच्या घरी यंदा लग्नाची जोरदार तयारी सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच अंबानी कुटुंबीयांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाची घोषणा केली. त्यापाठोपाठ मुकेश आणि नीता अंबानीची मुलगी ईशादेखील विवाहबंधनात अडकणार असल्याची आज माहिती देण्यात आली आहे.  

 ईशा उतरणार सिनेक्षेत्रात   

 ईशा अंबानी लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे. अक्षय कुमारच्या आगामी 'केसरी' या चित्रपटातून ईशाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री होत आहे. ईशा अभिनेत्री म्हणून नव्हे तर या चित्रपटाची प्रोड्युसर म्हणून काम पाहणार आहे.  
 
 करण जोहर सोबत ईशा या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार 'केसरी' हा चित्रपट यापूर्वी सलमान खान आणि करण जोहर एकत्र प्रोड्युस करणार होते. 'केसरी' या चित्रपटामध्ये अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. त्याचा फर्स्ट लूकदेखील लोकांसमोर आला आहे. हा चित्रपट 'बॅटल ऑफ सारागढी' वर आधारित आहे.  

 डिसेंबर महिन्यात ईशा अडकणार लग्नबंधनात  

 आज ईशा आणि आनंद पिरामल हे डिसेंबर महिन्यात लग्न करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.  ईशा अंबानी जिओ आणि रिलायंस रिटेल बोर्डमध्ये आहे. येल युनिव्हर्सिटीमधून ईशाने मानसशास्त्र आणि साऊथ एशियन स्टडीजमध्ये बॅचलर डिग्री मिळवली आहे. जून महिन्यात ग्रेजुएट स्कूल ऑफ बिजनेस, स्टेनफोर्ड मधून ती बिजनेस एडमिनिस्ट्रेशन प्रोग्राममध्ये मास्टर्स  डिग्री मिळवणार आहे. 

 कोण आहे आनंद पिरामल ? 

  आनंद हार्वर्ड बिजनेस स्कुलचा पदवीधर आहे. सध्या तो पिरामल एंटरप्राईजचा एक्जीक्यूटिव डायरेक्टर आहे. बिजनेस स्कूलमधून बाहेर पडल्यानंतर त्याने दोन स्टार्टअप सुरू केले. त्यापैकी एक आरोग्यक्षेत्रातील तर दुसरा रिएल इस्टेलमध्ये आहे.