जान्हवी नेहमी सोबत ठेवते पिंक बॉटल, काय रहस्य ?

जान्हवीच्या हातात बऱ्याचदा पिंक कलरची बॉटल पाहायला मिळते. या बॉटलशी जान्हवीचं काहीतरी नातं असेल असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नक्की पडत असेल. 

Updated: May 5, 2018, 08:05 AM IST
जान्हवी नेहमी सोबत ठेवते पिंक बॉटल, काय रहस्य ? title=

मुंबई : जान्हवी कपूरच आपली मम्मी श्रीदेवीसोबत चांगल बॉंडींग होतं. जान्हवीच्या बॉलीवूड एन्ट्रीसाठी श्रीदेवी जास्त आतूर होती. दरम्यान 'मॉम' सिनेमासाठी श्रीदेवीला मरणोत्तर बेस्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी मुलगी जान्हवी कपूर तिची साडी घालून दिल्लीतील विज्ञान भवनात पोहोचली.तिच्यासोबत लहान बहीण खुशी कपूर आणि पप्पा बोनी कपूरदेखील होते. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी जान्हवीचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेयर केला. तिने नेसलेल्या पिंक कलरच्या साडीला पिंक बॉर्डर आहे. झुमके आणि टिकलीसोबत जान्हवी सुंदर दिसत होती. जान्हवीचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील काही फोटोमध्ये एक साम्य आढळत. ते म्हणजे जान्हवीच्या हातात बऱ्याचदा पिंक कलरची बॉटल पाहायला मिळते. या बॉटलशी जान्हवीचं काहीतरी नातं असेल असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नक्की पडत असेल. 

दोन शक्यता 

 यातून दोन शक्यता नक्की असतील. एकतर पिंक कलर जान्हवीचा फेव्हरेट असावा. या बॉटलचा श्रीदेवीशी काही संबध असेल असे अनेकांना वाटते. तसही काही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यामध्ये एखाद्या मुलाखतीत ती आपल्या बॉटलमागच रहस्य नक्की सांगले अशी आशा करुयात. 

आईवडिलांवर प्रेम करा 

 श्रीदेवींच्या निधनानंतर जान्हवी कपूरने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी पहिल्यांदा तिच्या मनातील भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या. जान्हवीच्या मते ," मी आणि खुशीने केवळ आई गमावली मात्र पप्पांनी त्यांची 'जान' गमावली आहे. माझ्या वाढदिवसादिवशी तुमच्या आईवडिलांवर प्रेम करा , त्यांना तुमचा थोडा वेळ द्या. कारण त्यांच्यामुळेच तुम्ही आहात आणि माझ्या आईला (श्रीदेवी) श्रद्धांजली देताना तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा.