सनी लियोनीच्या 'त्या' फोटोमुळे 'JCB की खुदाई' होतंय ट्रेंड

'JCB की खुदाई' या ट्रेंड नंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम व्हायरल होत आहेत.

Updated: May 28, 2019, 07:27 PM IST
सनी लियोनीच्या 'त्या' फोटोमुळे 'JCB की खुदाई' होतंय ट्रेंड  title=

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. #10 year challenge च्या ट्रेंडनंतर आता 'JCB की खुदाई' हा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीने स्वत:चा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या फोटोमध्ये ती एका JCB मशीनवर उभी होती. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'Career change!? LOL' असे लिहिले होते. त्यानंतर 'JCB की खुदाई' हा ट्रेंड चांगलाच गाजत आहे.     

'JCB की खुदाई' या ट्रेंड नंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम व्हायरल होत आहेत.