दयाबेनला 'पागल औरत' म्हटल्याने जेठालाल अडकले वादाच्या भोवऱ्यात

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. 

Updated: May 1, 2021, 08:50 PM IST
दयाबेनला 'पागल औरत' म्हटल्याने जेठालाल अडकले वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. ही मालिका टप्पूसेनेमुळे लहान मुलांना तर गोकुळ धाम सोसायटीतील एकीमुळे मोठयांना आवडते. गेल्या 13 वर्षांपासून ही मालिका दर्शकांचं मनोरंजन करत आहे. दयाबेन, जेठालाल यांच्यासोबत बबीताजी देखील आपल्या जीवनाचा एक भाग झाल्या आहेत. मालिकतील प्रत्येक पात्र आणि त्यांचे डायलॉग दर्शकांना आवडतात. पण एका डायलॉगमुळे जेठालाल मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. 

'ए पागल औरत' जेठालाल यांचा हा डायलॉक आज देखील तुमच्या लक्षात असेल. तेव्हा या डायलॉगवरून अनेक मिम्स देखील व्हायरल झाले होते. या डायलॉगमागे दडलेलं कारण जेठालाल यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं. पॉडकास्टमध्ये  जेठालाल यांनी सांगितलं की, 'तो डायलॉग स्क्रिप्टमध्ये नव्हताचं. मी स्वतः तो डायलॉग तयार केला.'

पुढे सांगताना जेठालाल म्हणाले, 'सेटवर परिस्थिती अशी होती, दया तिचे डायलॉग बोलत होती आणि तेवढ्याच माझ्या तोंडातून 'ए पागल औरत' असे बोल बाहेर पडले. परंतु त्यानंतर महिलांनी माझा विरोध केला. कोणत्याही महिलेच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता.' असं जेठालाल म्हणजे अभिनेते दिलीप जोशी यांनी सांगितलं. 

2008 पासून सुरु आहे मालिका
'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही सोनी सब चॅनलवर चालणारी लोकप्रिय मालिका आहे.   जुलै 2008 मध्ये प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि तेव्हापासून टीव्हीवर  सुरु आहे.  ही मालिका 'दुनिया ने ऊंधा चश्मा' या साप्ताहिक कॉलमवर आधारित आहे.