फक्त 50 रूपयांवर काम करणारा अभिनेता आज यशाच्या उच्च शिखरावर

कोण आहे हा अभिनेता?  

Updated: Jan 29, 2021, 08:35 AM IST
फक्त 50 रूपयांवर काम करणारा अभिनेता आज यशाच्या उच्च शिखरावर

मुंबई : यशाच्या उच्च शिखरावर पोहोचण्यासाठी प्रत्येकाला अपार कष्ट करावे लागतात. या विश्वात असे अनेक मंडळी आहेत. त्यातील एक म्हणजे 'तारक मेहता का उलटा चष्मा' फेम अभिनेता दिलीप जोशी अर्थात जेठालाल. दिलीपला त्याच्या नावाने फार कमी लोक ओळखतात. पण जेठालालची ख्याती सर्वांनाच माहित आहे. दिलीपने अनेक चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये काम केले. परंतु 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेच्या माध्यमातून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

जेठालालला लोकप्रियता मालिकेच्या माध्यमातून मिळली. पण त्याने अभिनयाची सुरूवात सहायक अभिनेता म्हणून केली. फक्त ५० रूपयांच्या मानधनावर त्याने त्याच्या नव्या आयुष्याची सुरूवात केली. मात्र आज त्याने प्रत्येकाच्या मनात घर केलं आहे. 

महत्त्वाचं सांगायचं झालं तर दिलीपने अभिनयाची सुरूवात अभिनेता सलमान खान स्टारर 'मैंने प्यार किया' चित्रपटातून केली. चित्रपटात त्याने रामू नोकराची भूमिका साकारली होती.  १९८९ साली प्रदर्शित झलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान आणि दिलीप जोशी रुपेरी पडद्यावर झळकले होते. त्याकाळी या चित्रपटाने दमदार कामगिरी केली. 

त्यानंतर दिलीपने कधिही मागे वळून पाहिले नाही. वाट्याला आलेले यश, अपशांवर मात करत त्याने आज चाहत्यांचे मन जिंकले आहे. 'मैंने प्यार किया' चित्रपटानंतर दिलीपने “हम आपके हैं कौन” या चित्रपटात सलमानसोबत काम केले. 

यशाकडे वाटचाल करत त्याने १९९५ साली टीव्ही विश्वाकडे आपला मोर्चा वळवला. “कभी ये कभी वो” ही त्याची पहिली मालिका. दिलीपने या दोन चित्रपटांशिवाय 'हिन्दुस्तानी', 'खिलाड़ी ४२०', हमराज या चित्रपटांमध्ये देखील भूमिका बजावली आहे.