Kabir Bedi s First Wife Protima Bedi Went Naked On Beach : बॉलिवूड अभिनेता कबीर बेदी (Kabir Bedi) हे चर्चेत असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. कबीर यांनी 1971 साली 'हलचल' (Halchal) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अभिनयापेक्षा कबीर बेदी हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असायचे. कबीर बेदी यांनी एक-दोन नाही तर चार वेळा लग्न केलं. त्यांच्या अफेअरच्या चर्चा तर नेहमीच सुरु असायच्या. कबीर बेदी यांचे पहिले लग्न प्रोतिमा बेदी (Protima Bedi) यांच्याशी झाले होते. 1969 मध्ये लग्न बंधनात अडकलेल्या कबीर बेदी यांचा 1974 मध्ये घटस्फोट झाला. लग्नाच्या 5 वर्षांमध्येच त्यांचा घटस्फोट का झाला याचा खुलासा कबीर बेदी यांनी एका मुलाखतीत केला होता.
कबीर बेदी यांची पहिली पत्नी प्रोतिमा बेदी या एक ओडिसी नृत्यांगना होत्या. कबीर बेदींनी त्यांच्या 'स्टोरीज आय मस्ट टेल' या पुस्तकात सांगितले होते की, प्रोतिमा बेदीसोबतचे त्यांचे लग्न का आणि कसे तुटले? या पुस्तकात त्यांनी प्रोतिमा जुहू बीचवर नग्न अवस्थेत धावत असतानाची एक कहाणी सांगितली आणि कोणीतरी तिचे फोटो क्लिक केले. कबीर बेदी यांनीही एका मुलाखतीत याबाबत सांगितले होते. 'बॉलिवूड हंगामा' ला दिलेल्या मुलाखतीत कबीर बेदी यांनी सांगितले की 'आम्ही मलेशियात असताना प्रोतिमा माझ्या जवळ आली आणि मला मी स्ट्रीक केलं आहे, असं म्हणाली. एखाद्या गोष्टीच्या निषेधार्थ स्टेज किंवा रस्त्यावर निर्वस्त्र होण्याला स्ट्रिकिंग असं म्हणतात. स्ट्रिकिंग करताना कोणीतरी फोटो काढून ते मॅगझीनमध्ये छापल्याचं ती मला म्हणाली. ती माझ्याशी खोटं बोलली. परंतु, हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं नंतर मला कळलं' असं त्यांनी सांगितले.
कबीर बेदी पुढे म्हणाले की 'त्या घटनेने त्यांना धक्काच बसला होता. फक्त त्यांनाच नाही तर सर्वांनाच धक्का बसला. त्याच वेळी कबीर बेदी 'संदोकन'चे शूटिंग करत होते आणि त्यांना युरोपियन टीव्ही मालिकेची ऑफरही मिळाली. कबीर बेदींना आपले लक्ष कामावरून वळवायचे नव्हते आणि म्हणूनच त्यांनी तेव्हा त्या घटनेकडे फारसे लक्ष दिले नाही. कबीर बेदी यांनी प्रोतिमासोबतचे नाते जपले, त्यांच्या या कृतीने सर्वानाच त्या काळात आश्चर्यचकित केले होते.
हेही वाचा : लग्नाआधी Devoleena - विशालचा साखरपुडा? फोटोमुळे मोठं गुपित समोर
याविषयी कबीर बेदी म्हणाले होते की 'आम्ही त्यावेळी अशा काळात जगत होतो, जिथे आम्ही स्वत: च्या खासगी आयुष्यात स्वातंत्र्य शोधत होतो. यामुळे आमच्या विवाहाद्वारे एक आदर्श ठेवण्याची अपेक्षा आम्ही केली होती. पण शेवटी आमच्या लग्नाने स्वातंत्र्यापेक्षा जास्त चिंता आणि तणाव मिळू लागला होता. त्यामुळेच आमचे लग्न मोडले. माझ्या मुलांना सर्व काही माहित आहे.
प्रोतिमा यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर, कबीर बेदी आयुष्यात पुढे गेले. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले, प्रोतिमा यांनी 1998 मध्ये निवृत्ती घेतली आणि त्यांनी नाव बदलून प्रोतिमा गौरी ठेवले. त्याच वर्षी कैलास मानसरोवरला जाताना भूस्खलनात प्रोतिमा बेदी यांचा मृत्यू झाला. काही दिवसांनी त्याचा मृतदेह आणि कपडे सापडले. प्रोतिमा आणि कबीर यांना एक मुलगी आहे.