अडल्ट प्रमाणपत्र मिळालेल्या 'कबीर सिंग'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई

प्रस्थापित केला हा नवा विक्रम

Updated: Jul 4, 2019, 01:37 PM IST
अडल्ट प्रमाणपत्र मिळालेल्या 'कबीर सिंग'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई  title=

मुंबई : प्रेमात उध्वस्त  झालेल्या 'कबीर सिंग'ची प्रेम कहाणी चाहत्यांना कामालीची भावली आहे. दिवसागणिक चित्रपटाची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगलेच डोक्यावर घेतले आहे. शाहिदची मुख्य भूमिका असलेला 'कबीर सिंग' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारली आहे. चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्याच अठवड्यात १३२.४२ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला. 

तर सलग दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने १९८.९५ कोटी रूपयांचा आकडा पार करत २०० कोटींच्या घरात पोहोचलेल्या 'कबीर'ने बुधवारी ७.५३ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे. चित्रपटाने एकुण २०६.४८ कोटी रूपयांपर्यंत मजल मारली आहे. 'कबीर सिंग' यांदाच्या वर्षीचा 'ए' रेटेट चित्रपट ठरला आहे. 

भारत देशात 'कबीर सिंग' एकूण ३ हजार १२३ चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. 'कबीर सिंग' चित्रपट २०१९ मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. याआधी अभिनेता सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाने १४ दिवसात तर अभिनेता विक्की कौशलच्या 'उरी' चित्रपटाने २८ दिवसात २०० कोटींचा गल्ला पार केला होता.     
  
'कबीर सिंग' शाहिदच्या करियरला कलाटणी देणारा चित्रपट ठरला आहे. 'अर्जुन रेड्डी' या तेलुगू चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या 'कबीर सिंग'मध्ये शाहिद मध्यवर्ती भूमिकेत झळकत आहे. कियारा अडवाणी त्याच्यासोबत चित्रपटातून स्क्रीन शेअर करत आहे. प्रेमाची उध्वस्त कहाणी बॉक्स ऑफिसवर चांगलीच गाजत आहे.