South Indian Actress : दाक्षिणात्य अभिनेतेच नाही तर दक्षिणात्य अभिनेत्रींनी ही बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्वत:ची हजेरी लावली आहे. त्यांनी त्यांच्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मनं जिकंली आहेत. पण अशा अनेक दक्षिणात्य अभिनेत्री आहेत ज्यांनी आपलं नशीब चमकवण्याचे प्रयत्न केले पण त्या अपयशी ठरल्या. तर त्या दक्षिण भारतीय अभिनेत्री कोण आहेत ज्यांना ब़ॉलिवूडमध्ये तग धरता आला नाही. जाणून घेऊया...
काजल अग्रवालची गणना दक्षिण भारतीय अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिच्या अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. टॉलिवूडमध्ये लोक तिला खूप पसंत करतात आणि निर्माते आणि दिग्दर्शक त्यांना काजलला त्यांच्या चित्रपटांमध्ये कास्ट करू इच्छितात. मात्र बॉलिवूडमध्ये तिला ते यश मिळू शकले नाही. रोहित शेट्टीच्या सिंघममध्ये तिला लोकांनी पसंती दिली होती. पण याशिवाय दो लफ्जो की कहानी सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त काळ टिकू शकले नाहीत.
पूजा हेगडे ही देखील टॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. मोहेंजो दारो या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हृतिक रोशनसोबत काम करूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नाही. एवढेच नाही तर तिने प्रभाससोबत राधे श्याममध्येही काम केले होते. मात्र, हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. हल्ली पूजा हेगडेचे नाव बॉलिवूडचा दंबग अभिनेता सलमान खानसोबत जोडले जात आहे.
तृषा कृष्णन हिनं तिच्या अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. अनेक दक्षिणेत त्यांनी यश मिळवले आहे. त्याने बॉलिवूडमध्येही काम केले. खट्टा मीठा या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत दिसली होती, पण इथे ती तिच्या अभिनयाची जादू पसरवण्यात कमी पडली. यानंतर ती बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली नाही.
श्रिया सरन ही टॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तिला अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. दृष्यम आणि आरआरआर सारख्या चित्रपटांमध्ये तिचे काम लोकांना आवडले, परंतु याशिवाय इतर अनेक बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकले नाहीत. मात्र बॉलिवूडमध्ये तिला अपयशापुढे जावं लागले.
भूमिका चावला साऊथ इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, परंतु तिला बॉलीवूडमध्ये यशस्वी करिअर करण्यातही अपयश आले. भूमिका चावलाने सलमान खानच्या विरुद्ध तेरे नाम या ब्लॉकबस्टर चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटालाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. पण हळूहळू भूमिका इंडस्ट्रीतून गायब होऊ लागली. पदार्पणानंतर तिने आणखी एक-दोन चित्रपट केले ज्यात तिने सर्वोत्तम कामगिरी केली नाही आणि त्यानंतर तिच्या करिअरचा आलेख खाली जाऊ लागला. अशा प्रकारे, आश्वासक सुरुवात करूनही ती बॉलिवूडमध्ये स्वत:ला स्थापित करण्यात अपयशी ठरली.