काजलच्या आयुष्यात मोठे बदल होण्याची चर्चा; चित्रपटांमध्ये तिच्या जागी जॅकलीन फर्नांडिसची वर्णी?

लग्नानंतर  काजल अग्रवालच्या आयुष्यात होणार मोठे बदल

Updated: Sep 25, 2021, 08:04 AM IST
काजलच्या आयुष्यात मोठे बदल होण्याची चर्चा; चित्रपटांमध्ये तिच्या जागी जॅकलीन फर्नांडिसची वर्णी?

मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांध्ये आपल्या अभिनयाने  सर्वांना घायाळ करणारी अभिनेत्री काजल अग्रवालच्या जीवनात आता मोठे बदल होण्याची चर्चा आहे. होणाऱ्या बदलांसाठी काजल चित्रपटांमधूल काढत पाय घेणार असल्याचं समजत आहे. लग्नानंतर काजलचं जीवन नव्या वळणावर जाणार आहे. काजलने 2020 साली उद्योगपती गौतम किचलूसोबत लग्न केलं आहे. काजलने तिच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. लग्नानंतर सोशल मीडियावर सतत काजल आणि तिच्या लग्नाची चर्चा होती. 

काजलच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सांगायचं झालं तर, ती नागार्जुनच्या 'द घोस्ट' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार होती. पण आता तिच्या जागी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची वर्णी लागणार आहे. पण महत्त्वाचं म्हणजे अद्याप दोन्ही अभिनेत्रींकडून याबाबत कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नाही. 

पण लवकरचं चित्रपट निर्माते याबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. काजल एका महत्त्वाच्या आणि आनंदाच्या कारणासाठी काही दिवस ब्रेक घेणार असल्याची चर्चा रंगत आहे. काजल प्रेग्नेंट असल्याचं सांगितलं जात आहे. रिपोर्टनुसार, काजल लवकरच ज्या प्रकल्पांमध्ये काम करत आहे ते पूर्ण करणार आहे. 

दरम्यान, काजल अग्रवालने ३० ऑक्टोबर रोजी व्यावसायिक गौतम किचलू सोबत लग्न केलं. काजलच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. काजलने कोरोनाच्या काळात लग्न केलं याची देखील चर्चा झाली.