'या' कारणामुळे काजोलला पती अजयवर दाखल करायचा होता गुन्हा; जाणून घ्या नेमक प्रकरण काय?

बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री काजोलचा एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेत्री काजोल याच व्हिडीओमुळे सध्या पुन्हा चर्चेत आहे. 

Updated: Aug 25, 2023, 09:07 PM IST
'या' कारणामुळे काजोलला पती अजयवर दाखल करायचा होता गुन्हा; जाणून घ्या नेमक प्रकरण काय?  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी अभिनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री काजोलचा एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेत्री काजोल याच व्हिडीओमुळे सध्या पुन्हा चर्चेत आहे. नुकतंच अभिनेत्रीने ओटीटीमध्ये पदार्पण केलं आहे.  'द ट्रायल' द्वारे काजोलने ओटीटीमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटात ती एका वकिलाच्या भूमिकेत दिसली आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, जर तिला संधी मिळाली तर ती नक्कीच तिचा पती अजय देवगणवर खटला दाखल करेल.

काजोल तिच्या पतीवर करणार होती केस?
काजोलने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ती तिचा पती अजय देवगणवरही ती केस करु शकते. या मुलाखतीत काजोलला एक प्रश्न विचारण्यात आला की, तुला जर संधी मिळाली केस करायची तर तु कोणावर करशील?   याचबरोबर अभिनेत्रीने याचाही खुलासाही केला आणि म्हणाली की, 'मी अजय देवगणवर केस करेन आणि यासाठी मला कोणतंही कारण देण्याची गरज नाही. त्याच्यावर केस करण्याचं कारण म्हणजे तो माझा पती आहे. याशिवाय अन्य कोणत्याही कारणाची गरज नसून तो ही सर्व आरोप जाणून घेतल्यानंतर याचा स्विकार करेल. मात्र हा सगळा विषय तिने गंमतीत म्हटलाय त्यामुळे तुम्ही हे जास्त मनावर घेवू नका. 

काजोलने 1998 मध्ये अजय देवगणसोबत लग्न केलं, दोघंही एकत्र काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले. त्याचवेळी काजोलही करिअरच्या शिखरावर होती. याच दरम्यान, तिने अजयशी गुपचूप लग्न केलं. दोघांनाही दोन मुलं आहेत, एक मुलगी न्यासा देवगण आणि दुसरा मुलगा युग. युग लाइमलाइटपासून दूर राहतो पण न्यासा ही एक प्रसिद्ध स्टार किड आहे आणि ती नेहमीच मीडियामध्ये चर्चेत असते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुकतीच काजोलची वेब सिरीज 'द ट्रायल' 14 जुलैला रिलीज झाली. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. तर नेहमीच काजोल चर्चेत असते. सोशल मीडियावरही काजोलचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तर काजोल आणि अजय चाहत्यांची आवडती जोडी आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून हे कपल नेहमीच एकमेंकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. काजोलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अचानक पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.