'नाजायज मोहब्बत का अंजाम अक्सर तबाही ही होता है' 'कलंक' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

'कलंक' चित्रपटाच्या 11 मिनीटांच्या ट्रेलरमध्ये सर्व कलाकारांच्या भूमिका काही प्रमाणात समोर आल्या आहेत.

Updated: Apr 3, 2019, 07:11 PM IST
'नाजायज मोहब्बत का अंजाम अक्सर तबाही ही होता है' 'कलंक' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित  title=

मुंबई : बॉलिवूडमधील तगडी स्टरकास्ट असलेला 'कलंक' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकेवरून पडदा काढण्यात आला होता. तेव्हापासून चित्रपटाच्या चर्चा चांगल्याच रंगताना दिसत आहे. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारताना दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वरूण, आदित्य आणि आलिया यांच्या प्रेमाचे त्रिकूट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे माधूरी चित्रपटात नृत्यांगणाच्या भूमिकेत झळकणार आहे.  

'कलंक' चित्रपटाच्या 11 मिनीटांच्या ट्रेलरमध्ये सर्व कलाकारांच्या भूमिका काही प्रमाणात समोर आल्या आहेत. ट्रेलरच्या सुरूवातीला आलियाच्या रागात घेतलेल्या निर्णयाने सर्वांचे जीवन उध्वस्त झाल्याचे चित्रपटात दाखवले आहे. चाळीसच्या दशकात या चित्रपटाचे कथानक फिरताना दिसत आहे.

चित्रपटात वरूण धवण 'जफर' ही भूमिका साकारणार आहे तर आदित्य रॉय कपूर 'देव चौधरी'च्या भूमिकेत झळकणार असून संजय दत्त 'बलराज चौधरी'ची भूमिका बजावतात दिसणार आहे. माधूरी दीक्षित 'बहार बेगम'ची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. तर आलिया भट्ट 'रूप' आणि सोनाक्षी सिन्हा 'सत्या' भूमिकेत झळकणार आहेत. चित्रपटाची कथा भारत - पाकिस्तानच्या फाळणीवर आधारलेली आहे. 

ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये सिनेमाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक वर्मन यांनी केले आहे. फॉक्स स्टार स्टुडिओज, धर्मा प्रोडक्शन, नाडियादवाला ग्रँडसन्स एंटरटेन्मेंट यांची निर्मिती असणारा हा चित्रपट १७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.