करिना कपूर तिसऱ्यांदा होणार आई? सोशल मीडियावर बेबी बंपचा फोटो व्हायरल

करीना कपूरने २०१२ मध्ये सैफ अली खानसोबत लग्न केलं. 

Updated: Nov 12, 2022, 08:00 PM IST
करिना कपूर तिसऱ्यांदा होणार आई? सोशल मीडियावर बेबी बंपचा फोटो व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान  कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवत आहे. दरम्यान, ती सोशल मीडियावर देखील ती नेहमी सक्रिय असते आणि पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूर आणि जेह यांच्यासोबत गोंडस फोटो देखील शेअर करते. या सगळ्यामध्ये करिनाचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्याने लोक गोंधळलेले दिसत आहेत. या फोटोमध्ये करिनाचा बेबी बंप देखील स्पष्ट दिसत आहे आणि हे पाहून चाहते ती तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावत आहेत! खरंतर अभिनेत्रीचा हा फोटो जुलै महिन्यातला ज्यावेळी अभिनेत्री आपल्या कुटूंबासोबत लंडनला होती

करीना कपूरच्या या व्हेकेशनमध्ये तिच्यासोबत बहीण करिश्मा कपूर आणि बेस्ट फ्रेंड अमृता अरोराही दिसत आहे. या ट्रिपमध्ये ती खूप मजा करताना दिसत आहे  दरम्यान, तिचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती सैफ आणि एका व्यक्तीसोबत दिसत आहे.

या फोटोमुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. वास्तविक, काळ्या रंगाचा टँक टॉप घातलेली करीना कपूर या फोटोत प्रेग्नंट दिसत आहे. तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. करीना पुन्हा प्रेग्नंट आहे का, असा सवाल करत चाहते कमेंट करत आहेत.

करिनाचा हा फोटो पाहून चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत. कोणीतरी विचारत आहे की ती पुन्हा प्रेग्नंट आहे का त्याचवेळी, कोणीतरी  ती तिसऱ्यांदा आई होणार आहे का असे कमेंट करत आहेत.

याचबरोबर चाहत्यांनी करिनाच्या संपूर्ण ट्रिपचे फोटो पाहिल्यानंतर बहुतांश फोटोंमध्ये करीना मागे उभी दिसत आहे. काहींमध्ये तिने सैल कपडे घातले आहेत तर काहींमध्ये पोटासमोर हात ठेवलेला दिसत आहे.  त्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे

आता यात कितपत तथ्य आहे, हे फक्त करीना कपूर आणि तिच्या कुटुंबीयांनाच माहिती आहे. सध्या तरी तिने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही लोकांचं असंही म्हणणं आहे की, हा फोटो फोटोशॉप करून एडिट करण्यात आला आहे.

करीना कपूरने २०१२ मध्ये सैफ अली खानसोबत लग्न केलं.  2016 मध्ये करिनाने तैमूरला जन्म दिला. यानंतर 2021 मध्ये आणखी एका मुलाचा जन्म झाला, ज्याचं नाव जेह आहे. तिच्या दोन्ही मुलांच्या नावावरून बराच वाद झाला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर करीना आमिर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा'मध्ये दिसली होती. हा हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. त्यात मोना सिंगसह इतर स्टार्सही आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज झाला.