'त्या' चॅट प्रकरणी दीपिकाची मॅनेजर करिश्माने दिली कबुली

दीपिकाच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता     

Updated: Sep 25, 2020, 06:29 PM IST
'त्या' चॅट प्रकरणी दीपिकाची मॅनेजर करिश्माने दिली कबुली

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील 'ड्रग्स प्रकरण' सध्या चांगलचं गाजत आहे. या प्रकणाची साखळी दिवसागणिक वाढत असल्याचं चित्र समोर येत आहे. दरम्यान अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्यामध्ये जे चॅट झाले. त्यामुळे चांगलीचं खळबळ माजली आहे. शिवाय यामुळे दीपिकाच्या अडचणींमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण तिची मॅनेजर करिश्माने चॅट संबंधी महत्त्वाचे खुलासे एनसीबी चौकशी दरम्यान केले. 

गेल्या ६ तासांपासून एनसीबी करिश्माची चौकशी करत आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार करिश्माने त्या व्हाट्सऍप ग्रुप प्रकरणी एनसीबीला सांगितले आहे. या ग्रुपमध्ये फक्त तीन जणांचा समावेश होता. ज्यांचे नाव जया, करिश्मा आणि दीपिका असं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ग्रुपची ऍडमीन दीपिका होती. या ग्रुपमध्ये मुख्यतः ड्रग्सवरून चॅट होत असे. 

व्हायरल झालेल्या चॅटमध्ये २०१७ साली दीपिकाने  हशिश नावाच्या ड्रग्सची मागणी केल्याची कबुली देखील करिश्माने दिली असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, एनसीबीकडून रकुलची पाच तास चौकशी करण्यात आली. 

चौकशी दरम्यान आपण कधीही ड्रग्स न घेतल्याचा दावा रकुलनं केला. रकुल म्हणाली, '२०१८ मध्ये रिया आणि माझं ड्रग्जसंदर्भात व्हॉट्सऍप चॅट झाले होते. रिया माझ्याकडे ड्रग्ज मागत होती. रियाचे ड्रग्स माझ्या घरी असल्याची कबुली देखील रकुलने दिली.