प्रेग्नेंसीमध्ये Karisma Kapoor चा सासूकडून छळ, तर पतीकडून मारहाण

कपूर कुटुंबाची मुलगी आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचा सासरी झाला प्रचंड छळ; प्रेग्नेंसीमध्ये घतलेला ड्रेस पतीला न आवडल्याने मारहाण  

Updated: Dec 21, 2022, 11:35 AM IST
प्रेग्नेंसीमध्ये Karisma Kapoor चा सासूकडून छळ, तर पतीकडून मारहाण  title=

Actress Karishma Kapoor Divorce : अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) घटस्फोटानंतर सिंगल मदर म्हणून तिच्या दोन मुलांचा सांभाळ करते. महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन सोबतचं लग्न मोडल्यानंतर लोलोने उद्योगपती संजय कपूरसोबत (Sanjay Kapur) लग्न केलं. पण हे नातं फार काळ टिकलं नाही.  विभक्त झाल्यानंतर संजयने अभिषेक आणि करिश्माच्या नात्यावरही अनेक आरोप केले होते. एवढंच नाही, तर जेव्हा करिश्मा प्रेग्नेंट होती, तेव्हा सासू आणि पतीने तिला मारहाण केल्याचं अनेकदा समोर आलं. (sanjay kapur wife)

लग्नानंतर काही वर्षातच संजय आणि करिश्मामध्ये वाद सुरु झाले. सासरी छळ होत असल्यामुळे करिश्माने संजय आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप करत घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. अनेक वर्ष दोघांचं प्रकरण कोर्टात सुरु होतं. संजय मला प्रचंड त्रास देत असल्याचं करिश्माने याचिकेत म्हटलं. (Karisma Kapoor on Divorce with Sanjay Kapur)

गर्भवती असताना संजय आणि त्यांच्या कुटुंबियांकडून झालेल्या छळाबाबत खुद्द अभिनेत्रीने खुलासा केला होता. जेव्हा करिश्मा गरोदर होती तेव्हा संजयने तिच्यासाठी ड्रेस आणला होता. त्याने अभिनेत्रीला तो ड्रेल घाल म्हणून सांगितलं. जेव्हा पतीनेच आणलेल्या ड्रेसमध्ये करिश्मा चांगली दिसत नव्हती म्हणून संजयने त्याच्या आईला करिश्माला कानशीलात मारण्यास सांगितलं. (karishma kapoor marriage Sanjay Kapur)

वाचा | Viral Video : भगव्या बिकनीच्या वादानंतर दिपीका म्हणते, "रंगाचा कोणताही धर्म नसतो" 

करिश्माने 2003 मध्ये उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केलं. (karishma kapoor love story) पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. साल 2010 पासून दोघांमध्ये वादाची ठिणगी पेटली. त्यानंतर अखेर 2016 मध्ये संजय - करिश्माचा घटस्फोट झाला आणि दोघे कायमचे विभक्त झाले. त्याचवेळी संजयने करिश्मावर अनेक गंभीर आरोपही केले होते. करिश्माने पैशासाठी त्याच्याशी लग्न केल्याचा दावा करत संजयने फॅमिली कोर्टात नवी याचिका दाखल केली होती. (sanjay kapur net worth)

संजय कपूरचं तिसरं लग्न
संजयने एप्रिल 2017 मध्ये प्रिया सचदेव हिच्याशी कोर्ट मॅरेज केलं. दोघेही 5 वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. संजयचा हा तिसरा विवाह आहे. संजय कपूरची पहिली पत्नी डिझायनर नंदिता महतानी आहे. (sunjay kapur second wife)