KBC 16 : खिशात 260 रुपये घेऊन मुंबईत आलेला स्पर्धक 1 कोटींच्या प्रश्नावर मारणार तुक्का? Video पाहाच

Kaun Banega Crorepati 16 : 'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये आलेल्या तो स्पर्धक फक्त 260 घेऊन आला होता मुंबईत... 

दिक्षा पाटील | Updated: Sep 5, 2024, 10:44 AM IST
KBC 16 : खिशात 260 रुपये घेऊन मुंबईत आलेला स्पर्धक 1 कोटींच्या प्रश्नावर मारणार तुक्का? Video पाहाच title=
(Photo Credit : Social Media)

Kaun Banega Crorepati 16 : 'कौन बनेगा करोडपति 16' या कार्यक्रमाचा नवा एपिसोड हा प्रदर्शित झाला आहे. यावेळी हॉटसीटवर आदिवासी स्पर्धक बंटी वाडिवा होते. अमिताभ बच्चन यांनी शो सुरु करताच फास्टेस्ट फिंगर्स फर्स्ट सेगमेंटनं झाली. त्यावेळी प्रश्नाचं अचूक उत्तर देत बंटी हे हॉट सीटवर आले. त्यावेळी बंटी यांनी खुलासा केला की 'कौन बनेगा करोडपति' मध्ये येणं हे त्यांचं बऱ्याच काळापासून असलेलं एक स्वप्न आहे. बंटी यांनी त्यांच्या आयुष्यातील एक कहाणी शेअर केली ज्यात सांगितलं की त्यांचे वडील हे शेतकरी आहेत. जे महिन्याला फक्त 11 हजार रुपये कमावतात. आर्थिक संकटांना मात देत त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना लहाणाचं मोठं केलं आणि त्यांनी शिक्षण दिलं. बंटी यांनी सांगितलं की त्यांच्या ट्यूशनसाठी त्यांच्या आई-वडिलांनी कर्ज घेतलं होतं. त्याचं कारण म्हणजे त्यांना इच्छा होती की त्यांनी शेती पेक्षा दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात करिअर करावं.

बंटी यांनी हे देखील सांगितलं की त्यांच्या अकाऊंटला फक्त 260 रुपये असताना ते मुंबईला आले आणि आता केबीसीमुळे लखपती झाले आहेत. यावेळी जिंकलेल्या पैशांचा वापर बंटी यांना त्यांच्या वडिलांचं कर्ज फेडण्यासाठी करायचं आहे. त्यांना त्यांच्या गावातील लोकांना हा विश्वास दाखवायचा आहे की स्वप्न ही पूर्ण होऊ शकतात मग प्रवास हा कितीही खडतर असो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पुढे बंटी यांनी सांगितलं की 'त्यांच्या क्लासची फी ही 11,000 होती आणि आर्थिक संकटं असताना, माझ्या आई-वडिलांनी मला कायम पाठिंबा दिला. त्यांनी माझ्या ट्यूशनसाठी कर्ज घेतलं जेणेकरून मी शिकू शकेल. समाजाच्या अगदी छोट्या घटकाचा मी सदस्य असल्यानं आमच्याकडे मर्यादीत साधने उपलब्ध आहेत, त्यामुळेच केवळ ज्ञानाच्या जोरावर आम्ही यशस्वी होऊ शकतो. मला माझ्या गावातील लोकांसाठी एक उदाहरण व्हायचं आहे कारण पीढ्यानं पीढ्या तिथले लोक हे शेती करतात आणि तोच आमचा एकमात्र कमाईचं साधन आहे. मी माझ्या खात्यात फक्त 260 रुपये घेऊन मुंबईत आलो होतो आणि आता शोमुळए लखपती झालो आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

बंटी यांच्या खेळीविषयी बोलायचं झालं तर त्यांनी या शोमध्ये 25,00,000 रुपये जिंकले. एपिसोडच्या शेवटाकडे जात अमिताभ बच्चन यांनी घोषणा केली की पुढच्या एपिसोडमध्ये बंटी हे त्यांचा खेळ सुरु राहणार. त्याचा प्रोमो सध्या आला आहे त्यात पाहायला मिळते की बंटी हे 1 कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचले आहेत. त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत ते म्हणतात की 'माझ्या आयुष्यातील मी सगळ्यात मोठी रिस्क घेणार आहे.'