प्रिया प्रकाशचा दुसरा व्हिडिओ झाला व्हायरल

हॅलेंटाईन डेच्या आधी इंटरनेटवर प्रिया प्रकाश वॉरियर या मल्याळम अभिनेत्रीचा एक व्हिडिओ चांगलांच व्हायरल होत असताना आता दुसरा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओही पहिल्या व्हिडिओ प्रमाणे खूपच व्हायरल होत आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 13, 2018, 08:40 PM IST
 प्रिया प्रकाशचा दुसरा व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई : हॅलेंटाईन डेच्या आधी इंटरनेटवर प्रिया प्रकाश वॉरियर या मल्याळम अभिनेत्रीचा एक व्हिडिओ चांगलांच व्हायरल होत असताना आता दुसरा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओही पहिल्या व्हिडिओ प्रमाणे खूपच व्हायरल होत आहे. 

 ऑफीस, घर, कॉलेज सगळीकडे याच प्रिया प्रकाश वॉरिअरचीच चर्चा आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प, नाना पाटेकर, नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ एडीट करून व्हायरल होत आहे. 

दुसरा व्हिडिओ 

दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रिया प्रकाश ही शाळेच्या वर्गात बसली आहे. ती मोहम्मद रोशन या हिरोकडे पाहून आपल्या बोटांना किस देते. त्यानंतर त्या बोटांची पिस्तूल बनवते आणि त्याच्यावर गोळी झाडण्याची अॅक्शन करते. हा व्हिडिओ पहिल्या व्हिडिओ प्रमाणे धुमाकूळ घालणार आहे. हा व्हिडिओ प्रथम तुम्हांला झी २४ तास दाखवत आहे. 

 

 

 

इंटरनेटवर व्हायरल 

तिच्या स्टाईलमुळे ती खूपच चर्चेत आली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ती शाळेच्या यूनिफॉर्ममध्ये दिसते आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही काही न बोलता फक्त डोळ्यांच्या इशाऱ्यावर प्रेम व्यक्त करत आहेत.