'हर हर शंभो..' या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेली गायिका आहे तरी कोण आहे? वाचा

सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेली या अभिलाशा पांडा बद्दल आज आम्ही तुम्हाला काही दुर्मीळ माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ...

Updated: Aug 9, 2022, 11:18 AM IST
'हर हर शंभो..' या गाण्यामुळे घराघरात पोहोचलेली गायिका आहे तरी कोण आहे? वाचा  title=

मुंबई : 'हर हर शंभो शंभो महादेवा शंभो...' (Har Har Shambhu Shiv Mahadeva) हे गाणं तुम्ही तर ऐकलं असेलच. या गाण्याने सर्वाच्या मनावर राज्य केलं आहे. या गाण्याच्या शब्दांप्रमाणेच गायिकाच्या आवाजाची देखील प्रचंड चर्चा होतीये. तुम्हाला माहितीये का? या गाण्याची गायिका अगदी 18-19 वयाची मुलगी आहे. सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेली या अभिलाशा पांडा बद्दल आज आम्ही तुम्हाला काही दुर्मीळ माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ...

अभिलाशा पांडा (Abhilasha Panda) ही ओडिसाच्या केओंझार जिल्हातील ब्राम्हण कुटूंबात जन्म झाला. तिचे वडिल अशोक पांडा हे इंडियन आर्मीमध्ये होते आणि सेवानिवृत्तीनंतर आता एका प्रायवेट सिक्यूरिटी कंपनीमध्ये मॅनेजर आहेत. त्याचबरोबर, तिची आई शिक्षिका आहे. अभिलाशा पांडा 4 वर्षांची असतानापासून गायनाचं शिक्षण घेतलं आहे. तिला तिच्या आजोबांकडून गाण्याचं शिक्षणाचं बाळकडू मिळालेलं आहे. अभिलाशाचे आजोबा हे हार्मोनिअम वादक होते. अभिलाशा जेव्हा एलकेजीला होती तेव्हा तिने ओडिसा क्सासिक व्होकला वयाच्या चौथ्या वर्षी प्रवेश घेतला होता.

काही कारणांमुळे अभिलाशाने ओडिसा क्सासिक व्होकल क्लासला जाणं बंद केलं. 2015 ला द्रौपदी देवी क्लचरल इंस्टिट्यूट मधून तिने हिंदूस्तनी व्होकलचं शिक्षण पूर्ण केल. यानंतर 2017-18 गव्हर्नर्स ट्रॉफी इन हिंदुस्तानी क्लासिकल व्होकल किताबसुद्धा तिने जिंकला होता. अभिलाशा पांडाने आत्तापर्यंत तब्बल 8 भाषांमध्ये गाणे गायले आहेत. 2021 ला अभिलाशाने ओरिसा सुपरसिंगर या शोमध्ये देखील सहभाग नोंदवला होता. सुनिधी चौहान ही तिची आवडती गायिका आहे.

अभिलाशा पाडा जितकी गाण्यामध्ये उत्कृष्ट आहे तितकीच ती कराटे या खेळामध्ये देखील चांगली आहे. तिने या खेळात नॅशनल लेवलचा गोल्ड मेडल जिंकलेलं आहे.

अभिलाशाला सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर 32.1 हजार फॉलोअर्स आहेत.