हे खरंय? नवाजुद्दीन सिद्दीकीने या सिनेमासाठी घेतली होती फक्त १ रुपया फी !

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा आज देशाचा अभिमान आहे.

Updated: May 19, 2021, 01:37 PM IST
हे खरंय? नवाजुद्दीन सिद्दीकीने या सिनेमासाठी घेतली होती फक्त १ रुपया फी !

मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा आज देशाचा अभिमान आहे. देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचीही अशीच एक गोष्ट आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आज आपला वाढदिवस साजरा करतोय. नवाजुद्दीनने सर्व बॉलिवूड सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याने आमिर खानच्या 'सरफरोश' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्याची भूमिका कोणाला आठवत नाही. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याने त्याची ओळख निर्माण केली आहे.

नवाजने बॉलिवूडमध्ये तिन्ही खानसोबत चित्रपट केले आहेत. मुख्य म्हणजे हे तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. पण फारच कमी लोकांना माहिती आहे की नवाजुद्दीन सिद्दीकीने एका चित्रपटात फक्त 1 रुपये फी घेतली होती.

2018 मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, "हो, मी पैशांसाठी चित्रपट केले आणि पुढेही करीन. मी असे चित्रपट करतो कारण मला चांगले चित्रपट मिळावे अशी माझी इच्छा आहे, मात्र जिथे मला विनामूल्य काम करावं लागेल असेही चित्रपट मी करतो. "

२०१२ मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपुरमधून' बॉलिवूडमध्ये जोरदार एन्ट्री घेतली होती. 2018 मध्ये त्याचा 'मंटो' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रसिद्ध उर्दू लेखक सआदत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाच दिग्दर्शन नंदिता दास यांनी केलं होतं. नवाजने या चित्रपटासाठी फक्त एक रुपये फी घेतली. नवाजला त्यांच्या कथेतून स्वत: ला अमरत्व द्यायचं होतं आणि त्यानेही असं केलं.

सआदत हसन मंटो यांच्या पात्राला जेवढा नवाज ओळखायचा. समजायचा, त्यावरुन ही भूमिका फक्त आपल्यासाठीच बनवली गेली आहे असं त्याला वाटायचं, कारण तो स्वतःही असाच काहीसा आहे. या चित्रपटादरम्यान एका मुलाखतीत नवाज म्हणाला, "जेव्हा मला या चित्रपटाबद्दल विचारलं गेलं, त्यावेळी या भूमिकेत मी स्वत:लाच दिसत होतो. पण माझ्यात त्याच्यासारखी हिम्मत नाही आहे.

 "जेव्हा मी विचार केला की जर मी या चित्रपटासाठी नंदितांकडून पैसे घेतले तर ही गोष्ट मला खूप त्रास देईल आणि मी फक्त या चित्रपटासाठी एक अभिनेता होईन, मात्र मला या चित्रपटाचा एक महत्वाचा भाग असावा असं वाटायचं फक्त अभिनेता हा टॅग मला नको हवा होता. मात्र मी एक एक व्यावसायिक अभिनेता आहे म्हणून या चित्रपटासाठी फक्त एक रुपया घेतला''

या सिनेमात नवाजसोबत ऋषि कपूर, गुरदास मान, जावेद अख्तर, रणवीर शौरी, दिव्या दत्ता, पूरब कोहली, राजश्री देशपांडे आणि स्वानंद किरकिरे यांच्याही या सिनेमात उत्कृष्ट मुख्य भूमिका आहेत.