मुंबई : अभिनेता कुणाल खेमू एक उत्तम कलाकार आहे. कुणाल नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतो. पण कुणाल बाबतीत आता एक मोठी अपडेट समोर येतेय. ती म्हणजे अभिनयापासून दुरावत अभिनेत्याने दिग्दर्शनात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
आज, गणपतीच्या शुभ मुहूर्तावर, त्याच्या सोशल मीडियावर, कुणाल खेमूने त्याच्या चाहत्यांसाठी 'मडगाव एक्सप्रेस' नावाच्या चित्रपटासह एक्सेल एंटरटेनमेंट सोबत दिग्दर्शित केलेल्या उपक्रमाची घोषणा केली आहे. या पोस्टसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''गणपती बाप्पा मोरया म्हणून सर्व चांगल्या गोष्टी त्याच्या नावाने सुरू होतात.
तुम्हा सर्वांसोबत हे शेअर करण्यासाठी मी यापेक्षा चांगला दिवस विचार करू शकत नाही. माझ्या मनातल्या एका कल्पनेने सुरुवात झाली जी स्वप्नात बदलली. जी माझ्या लॅपटॉपवर शब्दांमध्ये वाहत गेली आणि आता ती रुपेरी पडद्यावर प्रत्यक्षात येईल.
माझ्या स्क्रिप्टवर आणि माझ्या व्हिजनवर विश्वास ठेवल्याबद्दल आणि सिनेमाच्या जगातल्या या रोमांचक प्रवासात माझ्यासोबत भागीदारी केल्याबद्दल Excel Entertainment तर्फे रितेश, फरहान आणि रुचा यांचे खूप खूप आभार. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि गणपती बाप्पाचे आशीर्वाद मागतो. "मडगाव एक्सप्रेस" सादर करत आहोत.
Ganpati Bappa Moriya!
As all good things begin with his name I can’t think of a better day to share this with all of you.
It started with a thought in my head, which grew into a dream which flowed out through my fingers into words on my laptop, and now it is becoming a reality pic.twitter.com/j5eVXJOH7ekunal kemmu (kunalkemmu) August 31, 2022
याआधी फरहान अख्तरने 2001 मध्ये 'दिल चाहता है'मधून दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. याशिवाय झोया अख्तरने 2009 मध्ये लक बाय चान्स या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले आणि आता कुणाल खेमू देखील या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाचा प्रवास सुरू करत आहे.