close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लॅक्मे फॅशन वीक : बेबी बंपसह नेहाचा रॅम्पवर जलवा

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी १० मे रोजी विवाहबद्ध झाले. 

Updated: Aug 28, 2018, 09:39 AM IST
लॅक्मे फॅशन वीक : बेबी बंपसह नेहाचा रॅम्पवर जलवा

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता अंगद बेदी १० मे रोजी विवाहबद्ध झाले. त्यानंतर या सिक्रेट वेडींगची माहिती सोशल मीडियावरुन त्यांनी आपल्या चाहत्यांना दिली. त्यानंतर नेहा प्रेग्नेंट असल्याने घाईघाईत लग्न उरकले, अशा चर्चा रंगल्या होत्या. पण त्या अफवा असल्याचे दोघांनीही स्पष्ट केले. पण आता या अफवा खऱ्या असल्याचे समोर आले आहे. २४ ऑगस्टला दोघांनीही ट्विटरवर बेबी बंपसह फोटोज शेअर करुन ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांना दिली. 

त्यानंतर २५ ऑगस्टला लॅक्मे फॅशन वीकमध्ये पती अंगद बेदीसोबत नेहा बेबी बंप फ्लॉन्ट करत रॅम्पवॉकवर उतरली.

Neha Dhupia, Pregnancy, Lakme Fashion Week 2018

नेहाने इंस्टाग्रामवर लॅक्मे फॅशन वीकमधील काही फोटोजही शेअर केले. 

Neha Dhupia, Pregnancy, Lakme Fashion Week 2018

यावेळी नेहाने क्रिम रंगाचा ड्रेस परिधान केला होता तर अंगद बेदी मॅचिंग रंगाच्या कुर्ता पजामेमध्ये दिसला.

Neha Dhupia, Pregnancy, Lakme Fashion Week 2018

१० मे ला दिल्लीत गुरुद्वारात दोघांनी विवाहगाठ बांधली. 

Neha Dhupia, Pregnancy, Lakme Fashion Week 2018

अलिकडेच प्रदर्शित झालेल्या सुरमा सिनेमात संदीप (दिलजीत दोसांझ) च्या भावाची भूमिका अंगदने साकारली होती. हा सिनेमा दिग्गज हॉकीपटू संदीप सिंगच्या जीवनावर आधारित आहे. 

Neha Dhupia, Pregnancy, Lakme Fashion Week 2018

तर नेहा धुपिया 'तुम्‍हारी सुलु', 'करीब करीब सिंगल', 'जूली', 'क्‍या कूल हैं हम' यांसारख्या सिनेमात झळकली आहे. आता दोघांच्या आयुष्याची नवी सुरुवात होणार आहे. 

Neha Dhupia, Pregnancy, Lakme Fashion Week 2018