'शिकारा' बघून लाल कृष्ण आडवाणी भावूक : व्हिडिओ

विधु विनोद चोप्रांच्या 'शिकारा'चं कौतुक 

Updated: Feb 8, 2020, 08:04 AM IST
'शिकारा' बघून लाल कृष्ण आडवाणी भावूक : व्हिडिओ  title=

मुंबई : निर्माता - दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांचा बहुचर्चित सिनेमा 'शिकारा : द अनटोल्ड स्टोरी ऑफ कश्मीरी पंडित' शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. समिक्षक आणि प्रेक्षकांच्या या सिनेमाबाबत समिश्र प्रतिक्रिया आहेत. हा सिनेमा काश्मिरी पंडितांना एका रात्रीतून घाटीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, यावर आधारित आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेता लाल कृष्ण आडवाणी अतिशय भावूक झाले. 

नुकतंच या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. यामध्येच लाल कृष्ण आडवाणी भावुक झाल्याचे दिसले. लाल कृष्ण आडवाणी भावूक झाल्याचा व्हिडिओ स्वतः विधु विनोद चोप्रांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हा व्हिडिओसोबतच कॅप्शन देखील शेअर केली आहे. 'लाल कृष्ण आडवाणींनी शिकारा पाहिला. सिनेमावर केलेलं प्रेम आणि तुमच्या आशिर्वादासाठी आभारी आहे.' या व्हिडिओत विधु विनोद चोप्रा लाल कृष्ण आडवाणींना दिलासा देत असल्याच दिसतंय. 

1989च्या शेवटी आणि 1990 च्या सुरूवातीला काश्मिर घाटीतून काश्मिर पंडितांना बेदखल करण्यात आलं. आजही याची सल अनेक काश्मिरी पंडितांच्या मनात पाहायला मिळते. या विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा असून आदिल खान आणि सादिया या नव्या कलाकारांनी सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे.