डेटिंग साईटवर आहे लारा दत्ताची प्रोफाईल! व्हिडिओ व्हायरल

गेल्या काहि दिवसांपासून बॉलिवूड एक्ट्रेस लारा दत्ता डेटिंग एपवर असल्याची चर्चा आहे.

Updated: Nov 8, 2021, 10:50 PM IST
डेटिंग साईटवर आहे लारा दत्ताची प्रोफाईल! व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : गेल्या काहि दिवसांपासून बॉलिवूड एक्ट्रेस लारा दत्ता डेटिंग एपवर असल्याची चर्चा आहे.  लारा डेटिंग एपवर असल्याच्या बातमीने सोशल मीडियावरील ट्रोलर्संना अजून एक संधी मिळाली आहे. लाराने सांगितलं की, तिच्या  फेक प्रोफाईलला घेवून अनेक मीम्स पाठवले जात आहेत. हेच कारण आहे की, तिने ठरवलं की, ती व्हिडिओ बनवून आपली बाजू मांडेल.

शेअर केलेल्या व्हिडिओत लारा म्हणाली, 'गेले काही दिवस माझं इंस्टाग्राम नोटिफिकेशन मिम्स आणि मॅसेजने भरुन गेलय. युजर्स मला सारखं सांगत आहेत की, डेटिंग एपवर माझी एक प्रोफाईल आहे. ही एक विचित्र बाब आहे. आणि मागचे दिवस मी हे ऐकून टेंन्शनमध्ये होती. मी प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते. की, नेमकं खरं काय आहे. आता मी विचार केला आहे की,  व्हिडिओ बनवून तो पोस्ट करणं हा सगळ्यात चांगला ऑप्शन आहे. मी कधीच कुठल्या डेटिंग एपवर नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

डेटिंग एपला विरोध नाही
लारा पुढे म्हणाली, मी कोणत्याही डेटिंग एपच्या विरोधात नाही.  मला वाटतं की, हा एक वेगळाच मार्ग आहे एक दुसऱ्याला भेटण्याचा. मी पर्सनली या एपवर नाही . मात्र मीम्स पाहून खूप खुश आहे. मात्र त्यात कोणतच सत्य नाही.  मी खूप कमी इंस्टा लाईव्ह करते. यामुळे मी लोकांशी कनेक्ट नसते.