रात्री उशिरा अशा अवस्थेत अभिनेत्री साई पल्लवी कॅमेरात कैद; पाहा फोटो

साई पल्लवी सेंथामराय ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे

Updated: May 16, 2022, 08:10 PM IST
रात्री उशिरा अशा अवस्थेत अभिनेत्री साई पल्लवी कॅमेरात कैद; पाहा फोटो title=

मुंबई : साई पल्लवी सेंथामराय ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने फार कमी वेळात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ती केवळ अभिनयातूनच नाही तर डान्सनेही लोकांना प्रभावित करते. ती प्रामुख्याने तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये दिसते.

प्रेमम (2015) आणि फिदा (2017) मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ती ओळखली जाते आणि याआधी तिने 'श्याम सिंग रॉय' द्वारे प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यश मिळवलं आहे. अभिनेत्रीबद्दलची अपडेट अशी आहे की ती नुकतीच हैदराबादमधील एका थिएटरच्या बाहेर दिसली होती परंतु कोणालाही तिच्याबद्दल माहितीही नव्हती.

लोकांच्या नजरेतून वाचवताना दिसली साई पल्लवी
साई पल्लवीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पूर्णपणे झाकलेली होती. प्रेमम फेम अभिनेत्रीने रात्री उशिरा थिएटरमधून गर्दीतून बाहेर पडताना आपला चेहरा दुपट्ट्याने झाकला होता. लोकांच्या नजरेपासून वाचण्यासाठी तिने हे केलं, पण अभिनेत्री कॅमेऱ्यात कैद होण्यापासून वाचू शकली नाही. ती महेश बाबूचा नुकताच रिलीज झालेला 'सरकारू वारी पाता' पाहण्यासाठी गेली होती.

श्याम सिंह रॉय फेम अभिनेत्री राणा दग्गुबतीसोबत दिसणार आहे
साई पल्लवी शेवटची तेलुगू चित्रपट श्याम सिंग रॉय मध्ये नानीच्या सहकलाकाराच्या भूमिकेत दिसली होती. याद्वारे तिने तेलुगू प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे आणि आता ती राणा दग्गुबती आणि प्रियामणी यांच्यासोबत तिच्या आगामी 'विराट पर्वम' या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. वेणू उदुगुला दिग्दर्शित हा चित्रपट १ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.