VIDEO: लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ऋण 'ती' कधीच विसरणार नाही, वाचा असं काय घडलं होतं?

Laxmikant Berde Viral Video: अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांना कोणीच विसरू शकत नाही. त्यांना जाऊन 19 वर्षे झाली तरीसुद्धा आजही ते आपल्या सर्वांच्या मनात आहेत. सोबतच इतक्या वर्षात त्यांच्या चाहत्यांमध्ये नव्या पिढीचीही भर झाली आहे. सध्या त्यांचा एक जुना मुलाखतीतला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 18, 2023, 06:43 PM IST
VIDEO: लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ऋण 'ती' कधीच विसरणार नाही, वाचा असं काय घडलं होतं?  title=
June 18, 2023 | laxmikant berde speaks about his fan in an old interview video goes viral (Photo: @banvabanwi_official | Instagram)

Laxmikant Berde Viral Video: लक्ष्मीकांत बेर्डे हे आज आपल्यात नसेल तरीसुद्धा त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून आणि त्यांच्या न विसरता येणाऱ्या आठवणींच्या माध्यमातून ते आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनात कायमच आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल आत्ताच्या सोशल मीडियाच्या जमान्यातही काही लिहिलं बोललं गेलं नाही तरच नवल! त्यामुळे त्यांच्या आठवणी या सोशल मीडियावरही व्हिडीओच्या नाहीतर फोटोंच्या माध्यमातून आपल्या समोर येतात. लक्ष्मीकांत बेर्डे यांची दोन्ही मुलं अभिनय आणि स्वानंदी बेर्डे हेही अभिनयक्षेत्रात सक्रिय आहेत.

80 आणि 90 च्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे हे नावं सर्वत्र लोकप्रिय होतं. त्यावेळी त्यांच्या अनेक मुलाखतीही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावेळची अशीच एक मुलाखत सध्या चर्चेत आहे. या मुलाखतील एक भाग हा सध्या व्हायरल झाला आहे ज्यात लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या एका फॅन्ससोबतच्या अनुभवाबद्दल बोलताना दिसत आहेत. 

सोशल मीडियावर त्यांच्या एका जुन्या व्हिडीओची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे. यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला आहे. यात ते म्हणतात, मी एक प्रयोग केला, साधारण 12-12.30 च्या सुमारास तो प्रयोग संपला. त्यानंतर मी विंगेत होतो आणि एक माणूस आत आला. तो मला म्हणाला की लक्ष्मीकांतजी माझ्या बायकोला तुम्हाला भेटायचं आहे. मी म्हणालो तुम्ही त्यांना आत घेऊन या ना कारण मी खूपच खकलोय. त्यावर तो माणूस म्हणाला की की येऊ शकत नाही तेव्हा मी म्हटलं का? त्यावर तो म्हणाला की ती व्हिलचेअरवर आहे. मी म्हटलं अरे बापरे. तेव्हा मी धावत बाहेर गेलो. त्यांना बघितलं. त्यांना भेटलो. त्या व्हिलचेअरवरील बाईंनी 'कारटं' 20 ते 25 वेळा पाहिलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्यानं मला सांगितलं की लग्नाच्या आधी ही चांगल्या अवस्थेत होती परंतु लग्नानंतर तिचा अपघात झाला आणि तिचे पाय गेले. ती जवळपास वर्षभर कुणाशीच बोलली नाही. जेव्हा माझा टीव्हीला 'पाणी टंचाई' हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून त्या हसायला लागल्या. मग त्या माझे टीव्हीवरचे कार्यक्रम बघायला लागल्या. त्यानंतर त्याचं आयुष्यच बदलून गेलं. त्या आता आमच्याशी बोलतात. तो माणूस मला म्हणाला की हे सगळं तेही तुमच्यामुळे. मी म्हणालो, माझ्यामुळे नाही माझ्या विनोदामुळे त्या ठीक झाल्यात. या माझं काहीच नाही'', असं लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या मुलाखतीत म्हणाले. @banvabanwi_official वरून हा व्हिडीओ इन्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.