ब्रेस्टफिडिंगच्या फोटोवरुन ट्रोल करणाऱ्यांना लीसा हेडनचे सडतोड उत्तर

प्रसिद्ध मॉडल लीजा हेडनसाठी सोशल मीडियावर ट्रोल होणे काही नवे राहिलेले नाही.

Updated: Aug 29, 2018, 09:43 AM IST
ब्रेस्टफिडिंगच्या फोटोवरुन ट्रोल करणाऱ्यांना लीसा हेडनचे सडतोड उत्तर

मुंबई : प्रसिद्ध मॉडल लीसा हेडनसाठी सोशल मीडियावर ट्रोल होणे काही नवे राहिलेले नाही. कधी तिला हेअर कलरवरुन ट्रोल करण्यात आले तर कधी ब्रेस्टफिडींगच्या फोटोवरुन तिच्यावर निशाणा साधण्यात आला. पण सेलिब्रेटींसाठी ट्रोल होणे काही नवे नाही. या ट्रोलिंगला कसे उत्तर द्यायचे, हे त्यांना चांगलेच माहित असते.

तिला मिळाले विचित्र सल्ले

अलिकडेच लीसाने एका मुलाखतीत सांगितले की, स्तनपान करण्यावरुन लोकांनी तिला विचित्र सल्ले दिले. ती म्हणाली की, अनेकदा विचित्र प्रश्नांचा आणि कमेंट्सचा सामना करावा लागतो. पण मला असे वाटते की स्तनपान करणे प्रत्येक आईसाठी चांगले असते. मला जेव्हा याबद्दल प्रश्न विचारले जातात, तेव्हा मला थोडे अनकंपर्टेबल वाटते.

 

 

 

A post shared by Lisa Haydon (@lisahaydon) on

 

My Boys

A post shared by Lisa Haydon (@lisahaydon) on

तू गाय नाहीस...

लोकं मला विचारतात की, मी माझ्या बाळाला स्तनपान करते का? इतकंच नाही तर तू गाय नाही आहेस म्हणून बाळाला दूध पाजू नकोस, असे विचित्र सल्ले दिले जातात. कोणी काहीही म्हणालं तरी मला काही लाज वाटत नाही. अनेक महिला स्तनपान करत नाहीत पण मी करते. कारण मी माझ्या बाळाला स्तनपान करण्यास सक्षम आहे, यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजते. 

लीसाने स्तनपान करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर युजर्सने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. 

या अभिनेत्रींनीवरही निशाणा

लीसा शिवाय साऊथची अभिनेत्री गिलू जोसेफने ब्रेस्ट फिडींग करतानाचा फोटो शेअर केला होता. तर मॉडेल मारा मार्टिनने स्तनपान करताना रॅम्पवॉक केला होता.