'वेड' चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर अकुंश चौधरीच्या 'महाराष्ट्र शाहीर'ची बाजी, पाहा आत्तापर्यंतचं कलेक्शन

Maharashatra Shahir Box Office Collection: 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तूफान (Maharashtra Shahir News) गाजला आहे. या चित्रपटानं 3 कोटींचा गल्ला पार केला आहे. या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटीचाही फार मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचे दिसून आले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 5, 2023, 05:49 PM IST
'वेड' चित्रपटानंतर बॉक्स ऑफिसवर अकुंश चौधरीच्या 'महाराष्ट्र शाहीर'ची बाजी, पाहा आत्तापर्यंतचं कलेक्शन title=

Maharashatra Shahir Box Office Collection: 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांची तूफान पसंती (Maharashtra Shaheer Box Office Collection) पाहायला मिळते आहे. या चित्रपटानं अवघ्या काहीच दिवसात 3 कोटी रूपयांची कमाई केली आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाची सर्वत्र 'क्रेझ' निर्माण झालीये असं म्हणायला हरकत नाही. लॉकडाऊनपासून बॉक्स ऑफिसवरील चित्र हे बदलताना दिसत आहे. प्रादेशिक चित्रपटांना कुठेतरी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक प्राधान्य देताना दिसत आहेत. हिंदी चित्रपट कुठेतरी मागे पडताना दिसतो आहे.

यावर्षीही काहीसं हेच वातावरण बॉक्स ऑफिसवर (Maharashtra Sahir Box Office) पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच मराठी चित्रपटांची चर्चा आहे. आता 'महाराष्ट्र शाहीर'च्या बॉक्स ऑफिसवरील आकड्यांनी ते पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. मराठी चित्रपट आता सातासमुद्रापार पोहचला आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांसाठी आता हे खऱ्या अर्थानं सुवर्णयुग आलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संगीत, कला, राजकारण आणि समाजकारण याच्या पार्श्वभुमीसह शाहीर साबळे यांचा जीवनपट या चित्रपटातून समोर आलेला आहे आणि त्यांच्याची संलग्न असलेली माणसंही या चित्रपटातून समोर आली आहेत. 

केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' या (Kedar Shinde) चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. आता हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. शाहीर साबळे यांच्या या जीवनपटातून त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूचे दर्शन प्रेक्षकांना घडले आहे. शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे यांनी आपल्या आजोबांना कधीही प्रेक्षकांसमोर न आलेल्या जीवन पट हा रूपेरी पडद्यावर साकार केला आहे. त्यांची मुलगी सना शिंदे या चित्रपटात मुख्य भुमिकेत आहे. तिच्या अभिनयाचेही सर्वत्र कौतुक झाले आहे. बॉक्स ऑफिसवरील यशासोबतच या चित्रपटाला समीक्षकांनीही चांगले रिव्ह्यूज दिले आहेत. 

हेही वाचा - VIDEO: ''बायको जास्त कटकट करत असेल तर चप्पल उचला आणि...'' रितेश देशमुखचा नवा कानमंत्र

आत्तापर्यंत या चित्रपटानं 3.33 कोटी रूपयांचा गल्ला भरला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटानं 30 लाख रूपये, दुसऱ्या दिवशी 55 लाख रूपये, तिसऱ्या दिवशी 60 लाख रूपये, चौथ्या दिवशी 1.03 कोटी रूपये तर पाचव्या आणि सहाव्या दिवशी अनुक्रमे 34 लाख रू़पये आणि 31 लाख रूपये असा गल्ला भरत आत्तापर्यंत 3 कोटी रूपयांचा गल्ला भरला आहे. सध्या सर्वांनाच उन्हाळी सुट्टी लागली आहे तेव्हा यंदाच्या मे महिन्याच्या सुट्टीत महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली आहे.