'मलाही घेऊन चल ना अमेरिकेला' हे आईचं वाक्य इतकं लागलं की...; पृथ्वीकचा Reel व्हायरल

Trending Reel Video : याहून सुंदर Reel तुम्ही पाहिलंच नसेल; सातासमुद्रापार अमेरिकेत आईच्या आठवणीत पृथ्वीक प्रतापनं केलं तरी काय? 

सायली पाटील | Updated: Jul 14, 2023, 01:58 PM IST
'मलाही घेऊन चल ना अमेरिकेला' हे आईचं वाक्य इतकं लागलं की...; पृथ्वीकचा Reel व्हायरल title=
maharashtrachi hasya jatra fame prithvik pratap shares special video from america reminds his mother

Trending Reel Video : सोशल मीडियाचं कोणतंही अॅप सुरु केल्यानंतर आपल्या समोर सर्वप्रथम काही ट्रेंडिग विषय, व्हिडीओ किंवा मग फोटो येतात आणि नजरा खिळवतात. सध्या असाच एक व्हिडीओ Instahram सुरु केल्याक्षणी सर्वांच्या वॉलवर येत आहे. आता आतातर हा व्हिडीओ एफबी आणि युट्यूब शॉर्ट्समध्येही दिसत आहे. कारण, तो व्हिडीओ आहेच तितका खास. 

तसं पाहिलं तर या व्हिडीओमध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम मराठमोळा अभिनेता पृथ्वीक प्रताप परदेशी रस्त्यांवर चालताना दिसत आहेत. व्हिडीओ व्यवस्थित निरखून पाहिल्यास परदेशात जाऊन तो चक्क भारतीय पेहरावात दिसतोय हे वेगळेपण लक्षात येतं. त्याच्या या पोस्टचं कॅप्शन वाचल्यानंतर नेमकं चित्र अधिकच स्पष्ट होतं. 

पृथ्वीकची अमेरिका वारी आणि आईची इच्छा... 

पृथ्वीकनंच हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो अमेरिकेत गेल्याचं पाहायला मिळत असून, त्याचं आईशी असणारं गोड नातं इथं हळुवार उलगडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिकेत गेल्यावर आईविषयी पृथ्वीक लिहितो, 'अमेरिकेला येण्यासाठी ची सगळी तयारी सुरू असताना आई अचानक म्हणाली ‘मला पण घेऊन चल ना अमेरिकेला’ आणि तिच्या या वाक्यावर तिला काय उत्तर देऊ हे मला कळेच ना… खूप विचार केला आणि लक्षात आलं की आता सध्या तरी आई ला प्रतिकात्मक रूपे अमेरिकेत घेऊन जाऊ शकतो म्हणून आज न्यूयॉर्क शहर फिरत असताना आईच्या साडी पासून बनवलेला कुर्ता घातला आणि सगळं शहर पिंजून काढलं तेवढच आपलं आई आपल्या सोबत असल्याची फीलिंग.'

सततचे कार्यक्रम, बदललेलं हवामान या साऱ्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम झाला खरा पण आईच्या पदराखालीच वावरत असल्यामुळं अमेरिकेत या गोष्टीही फारशा जाणवल्या नाहीत इतक्या सुरेख शब्दांत पृथ्वीकनं आईची साथ नेमकी किती महत्त्वाची हे शब्दांत मांडलं. त्याचं हे रील प्रचंड व्हायरल झालं, वारंवार पाहिलं गेलं, त्याहूनही त्यानं व्यक्त केलेल्या या भावना जरा जास्तच लक्ष वेधून गेल्या. 

हेसुद्धा वाचा : Baipan Bhari Deva चित्रपटाचं राज ठाकरे कनेक्शन माहितीये? खुद्द केदार शिंदे यांनीच सांगितलं...

 

आई सर्वांसाठीच खास असते. तिच्यासोबत तिला हवं त्या ठिकाणी फिरायला जाण्याचा अनुभवही प्रत्येकासाठीच नवा आणि तितकाच सुखद असतो. पृथ्वीकही येत्या काळात आईची ही इच्छा पूर्ण करणार असून, त्यानं जणू हे आश्वासनच चाहत्यांना दिलं आहे.