माहीचा डिलीव्हरी रूममधील फोटो व्हायरल; सांगितला बाळाला जन्म देताना आलेला अनुभव

अभिनेता आणि होस्ट जय भानुशालीची पत्नी माही विज  यांनी दीड वर्षांपूर्वी मुलगी ताराला जन्म दिला. 

Updated: Apr 10, 2021, 02:20 PM IST
माहीचा डिलीव्हरी रूममधील फोटो व्हायरल;  सांगितला बाळाला जन्म देताना आलेला अनुभव

मुंबई : अभिनेता आणि होस्ट जय भानुशालीची पत्नी माही विज  यांनी दीड वर्षांपूर्वी मुलगी ताराला जन्म दिला. आज माहीने त्या क्षणाला पुन्हा जिवंत केलं आहे. तिने सोशल मीडियावर  डिलीव्हरी रूममधील फोटो पोस्ट करत, बाळाला जन्म देताना अनुभव शेअर केला आहे. माहीचा हा  फोटो फार बोलका आहे. फोटोमध्ये माही बेडवर झोपली आहे तर जय तिच्या बाजूला बसला आहे. त्या दोघांमध्ये त्यांची मुलगी तारा आहे. बाळाला जन्म देणं फार कठीण असल्याचं माही याठिकाणी म्हटली आहे. 

माही म्हणते की, 'एका बाळाला जन्म देणं फार कठीण आहे. सर्वात कठीण वेळ अशी आहे जेव्हा सी-सेक्शन होतं आणि बाळाचा सांभाळ करायचा आहे. टाके आणि त्यात भर म्हणजे शरीराला होणारी वेदना. सी सेक्शन सामान्य प्रसूतीपेक्षा अगदी भिन्न आहे. पण मला असं वाटतं की जीवनात होणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मजबूत करते.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mahhi tarakhushirajveer (@mahhivij)

माही पुढे म्हणाली, 'आपल्या सर्वांना माहित आहे महिलांपेक्षा जास्त मजबूत कोणी नाही. त्रास  फार होतो. पण जेव्हा आपल्या बाळाला पाहतो तेव्हा सगळा त्रास आपोआप नाहिसा होतो.' असं सांगत तिने ताराला जन्म देताना आलेला अनुभन सांगितला आहे. सध्या माहीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. 

माही आणि जय यांनी 2010 साली लग्न केलं आहे. लग्ना झाल्यानंतर 9 वर्षांनंतर त्यांना तारा झाली. 21 ऑगस्ट 2019 साली त्यांनी मुलीला जन्म दिला. जय आणि माही प्रसिद्ध कलाकार आहेत. दोघेही सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.