Haladi Song : सईच्या हळदीला घुमणार आगरी गायक परमेश माळीचा आवाज!

सईच्या हळदीचा आगरी ठेका 

Updated: Feb 4, 2021, 06:32 PM IST
Haladi Song : सईच्या हळदीला घुमणार आगरी गायक परमेश माळीचा आवाज! title=

मुंबई : झी मराठीवरील (Zee Marathi) लोकप्रिय मालिका 'माझा होशील ना' (Majha Hoshil Na) मध्ये सध्या सई (Sai) आणि सुयशच्या (Suyash) लग्नाची लगबड आहे. सईच्या विरोधात तिचं लग्न यशसोबत केलं जात आहे. सुयशने बिराजदार यांना देखील आपल्या बाजूने वळवलं असून आदित्यला सईपासून दूर ठेवलं आहे. सध्या मालिकेत सईच्या लग्नाची रेलचेल असल्यामुळे नाच-गाणं तर होणारच आहे. 

मालिकेत सई आणि सुयशची हळद होणार असून हळदीला चांगलाच राडा होणार आहे.  सोशल मिडीयावर गाजणारे आगरी गाण्यांमधील प्रसिद्ध गायक परमेश माळी आपली गाणी सादर करताना दिसणार आहेत. 'माझा होशील ना' च्या शुक्रवारच्या भागात परमेश माळी यांनी सईसाठी केलेले खास गाणेही पाहता येणार आहे. तेव्हा आगरी भाषेतल्या हळदीच्या गाण्यांची मजा घ्यायला शुक्रवारचा भाग चुकवू नका.

प्रेक्षकांना सई आणि आदित्यचं लग्न व्हावं असं मनापासून वाटत असलं तरीही सई आणि सुयशचं लग्न होत आहे. यामुळे चाहते नाराज आहेत. पण या हळदीचं गाणं प्रेक्षकांचं मन परिवर्तन करेल यात काही शंका नाही. पाहा हळदीचं धम्माल गाणं.....

सई आणि सुयशच्या लग्नातील खास गाण्यावर धरा ठेका....