Oscars : बॉलिवूड नाही तर 'या' मल्याळम चित्रपटाला मिळाली ऑस्करमध्ये एन्ट्री!

Oscar 2024 Nomination Malayalam Film : यंदाच्या वर्षी 2024 च्या ऑस्करसाठी भारताकडून ऑफिशियल एन्ट्रीमध्ये मल्याळम चित्रपटानं बाजी मारली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 27, 2023, 03:05 PM IST
Oscars : बॉलिवूड नाही तर 'या' मल्याळम चित्रपटाला मिळाली ऑस्करमध्ये एन्ट्री! title=
(Photo Credit : Social Media)

Oscar 2024 Nomination Malayalam Film : ऑस्कर हा पुरस्कार चित्रपटसृष्टीतील सगळ्यात महत्त्वाचा आणि बहुचर्चित पुरस्कार असतो. दरवर्षी प्रेक्षक ही प्रतिक्षा करत असतात की यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी कोणत्या चित्रपटाला भारतातून एन्ट्री मिळाली आहे, हे जाणून घेण्याची इच्छा असते. यंदाच्या वर्षी म्हणजे 2024 च्या ऑस्करसाठी भारताकडून ऑफिशियल एन्ट्रीमध्ये मल्याळम चित्रपटानं बाजी मारली आहे. ' 2018 एवरीवन इज ए हीरो' या चित्रपटानं बाजी मारली आहे. 

हा चित्रपट 2018 मध्ये केरळमध्ये आलेल्या पुराच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या कथेवर आधारित आहे. नैसर्गिक आपत्तीवर मानवी विजयाचे चित्रण या चित्रपटात आहे. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीत ऑस्कर पुरस्काराच्या स्पर्धत असणार आहे. या श्रेणीला सगळयात आधी सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटाचा किताब देण्यात आला होता. 2002 मध्ये लगान पासून ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्मसाठी कोणत्याही भारतीय चित्रपटाला एन्ट्री मिळाली नव्हती. याआधी, फक्त दोन चित्रपटांना टॉप फाईव्हमध्ये जागा मिळाली होती. त्यात अभिनेत्री नर्गिस यांचा मदर इंडिया आणि मीरा नायर यांचा सलाम बॉम्बे हे चित्रपट होते. तर 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी 96 वा ऑस्कर 10 मार्च 2024 रोजी लॉस एंजेलिस येथे होणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ऑस्कर 2024 साठी मल्याळम चित्रपट 2018 निवडण्यापूर्वी, द केरला स्टोरी (हिंदी), रॉकी और रानीकी प्रेम कहाणी , मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे (हिंदी), बालागम (तेलुगु), वाळवी (मराठी), बाप्ल्योक (मराठी) आणि 16 ऑगस्ट आणि 1947 (तमिळ) यांच्यासोबत आणखी 22 चित्रपटांचा विचार करण्यात आला होता. सगळ्यात शेवटी '2018 एवरीवन इन ए हीरो' नं बाजी मारली. त्यानंतर या चित्रपटाला ऑस्कर 2024 मध्ये भारताकडून अधिकृत प्रवेश मिळाला.

हेही वाचा : रश्मिका मंदानाबद्दल एक्स बॉयफ्रेण्डचा मोठा खुलासा! 6 वर्षांपूर्वी ब्रेकअप झाल्यानंतर आजही ती...

मल्याळम चित्रपटसृष्टीच्या जगात हा एक अप्रतिम चित्रपट ठरला आहे. या चित्रपटानं मल्याळम चित्रपटसृष्टीचं नाव अभिमानानं उंचावले आहे. इतकंच नाही तर यंदाच्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा मल्याळम चित्रपट ठरला. या चित्रपटानं आजपर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या तीन मल्याळम चित्रपटांचा किताब पटकावला आहे. जूड अँथनी जोसेफ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शित केले आहे. तर हा चित्रपट यंदाच्या वर्षी मे महिन्यात प्रदर्शित झाला आहे.