मल्लिका शेरावातचा पूलमधील तो व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री मल्लिका शेरावत नेहमीच चर्चेत असते

Updated: Jan 25, 2022, 09:40 PM IST
मल्लिका शेरावातचा पूलमधील तो व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई  : मल्लिका शेरावत ही अशीच एक अभिनेत्री आहे जी दररोज सोशल मीडियावर आपल्या सौंदर्याचा चाहत्यांना घायाळ करत असते. पुन्हा एकदा तिने आपला किलर परफॉर्मन्स दाखवला आणि दरवेळेप्रमाणे यावेळीही चाहत्यांची मने तिने जिंकली आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत आज फिल्मी दुनियेपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती तिच्या फोटोंने नेहमी चर्चेत असते. मल्लिका शेरावतने हिंदी चित्रपटांशिवाय हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अलीकडेच मल्लिकाने स्वतःचा एक व्हिडिओ आणि काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती पूलमध्ये चहा पिताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर लोकं जोरदार कमेंट करत आहेत.

लॉस एंजेलिसमध्ये रहाते मल्लिका
मल्लिका शेरावत अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे शिफ्ट झाली असून ती मुंबईत ये-जा करत असते. सध्या ती भारतात आहे आणि तिच्या हॉटनेसची जादू सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहे. यापूर्वी तिने पूलमध्ये प्रिंटेड बिकिनी घातलेला व्हिडिओ शेअर केला होता. फोटोत ती तलावाच्या बाजूला उभी आहे आणि तिची फिगर फ्लॉंट करत आहे. व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'जास्मिन ग्रीन टी कप एन्जॉय करत आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

टीव्ही मालिकेत दिसलीये मल्लिका
 वयाच्या ४५ व्या वर्षी मल्लिका शेरावतचं हे रूप पाहून सगळेच हैराण झाले आहेत. ती तिच्या झणझणीत फोटोंनी खूप कहर निर्माण करत आहे. मल्लिकाने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती. ज्या जाहिरातींमध्ये ती दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यासोबत दिसली. 'जीना सिरफ मेरे लिए' या चित्रपटातील छोट्या भूमिकेतून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात झाली.