Abhijeet Khandkekar Special Post Sukhada Khandkekar : मराठी मनोरंजनसृष्टीतील चॉकलेट हिरो म्हणून अभिजीत खांडकेकरकडे पाहिले जाते. सध्या तो मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अभिजीत खांडकेकर हा सध्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत झळकत आहे. आता नुकतंच अभिजीतने त्याची पत्नी सुखदा खांडकेकरसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिजीत खांडकेकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमीच इन्स्टाग्रामवर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. नुकतंच अभिजीतने त्याची पत्नी सुखदा खांडकेकरसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. अभिजीतप्रमाणे सुखदा देखील उत्तम अभिनेत्री आहे. सुखदा ही ‘अजातशत्रू’ या हिंदी नाटकात झळकत आहे. त्याने या नाटकाचा प्रयोग पाहून तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
काल इब्सेन फेस्टीवल मधलं इला अरूण ह्यांनी रूपांतरीत केलेलं आणि इला अरूण आणि के के रैना सरांनी दिग्दर्शित केलेलं ‘अजातशत्रू’ हे हिंदी नाटक पहायचा योग आला. अत्यंत गंभीर विषयावरचं पण तितकंच प्रभावीपणे सादर केलेलं नाटक सगळ्यांनी पहावं असच आहे… गौरव अमलानी ह्या आमच्या मित्राने प्रमुख भुमिका अतिशय ताकदीने पेलली आहे. अनेक पात्र असुनही प्रत्येकाने आपल्या वाट्याला आलेली भुमिका उत्तम साकारलीये.
पण ह्या सगळ्यात उठून दिसणारी - सुखदा तुझं कौतुक करावं तेवढं कमी.. एकाच नाटकात दोन पात्रांचा अभ्यास करणं आणि त्या दोन्हींपैकी कुठलं छान साकारलं म्हणून प्रेक्षकांना तितकंच बुचकळ्यात पाडावं हे तुच करू जाणे. प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळेसची तुझ्या मेहेनतीचा मी सगळ्यात जवळचा साक्षीदार आहे… इतकी मेहेनत, इतकं डेडिकेशन, प्रत्येक गोष्ट परफेक्ट व्हावी म्हणून असलेला पराकोटीचा अट्टाहास आणि तळमळ बघून एखाद्या वर्गात सतत पहिल्या येणाऱ्या मुलीबद्दल जशी असुया वाटते ना तशी वाटते… आणि वाटतो प्रचंड अभिमान. इतकं सगळं करून स्टेजवरचा तुझा वावर, तुझं सहज ते पात्र होऊन जाणं, हिंदीवरचं प्रभुत्व प्रेक्षकांना खिळवून ठेवत नसेल तर नवलच. खूप प्रेम, प्रचंड आदर, असे अभिजीत खांडकेकरने म्हटले आहे.
अभिजीत खांडकेकरच्या या पोस्टवर सुखदा खांडकेकरने कमेंट केली आहे. "तू आहेस म्हणून मी आहे. आय लव्ह यू", असे सुखदाने म्हटले आहे. दरम्यान अभिजीतप्रमाणे सुखदाही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. सुखदा ही आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर मराठी आणि हिंदी रंगभूमी गाजवत आहे.