मराठी अभिनेत्याच्या आईचे कर्करोगाने निधन, म्हणाला 'तिच्या नसण्याने आमच्या आयुष्यात...'

सुनिता खेडेकर यांचे 15 मे 2024 रोजी कर्करोगाने निधन झाले. त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. 

नम्रता पाटील | Updated: May 17, 2024, 07:35 PM IST
मराठी अभिनेत्याच्या आईचे कर्करोगाने निधन, म्हणाला 'तिच्या नसण्याने आमच्या आयुष्यात...' title=

Ameet Khedekar Mother Died Due To Cancer : मराठमोळा अभिनेता अमित खेडेकर आणि अभिनेत्री रश्मी अनपट या दोघांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अमित खेडेकरची आई सुनिता खेडेकर या कर्करोगाशी झुंज देत होत्या. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्या ६० वर्षांच्या होत्या. अमित खेडेकरने आईच्या निधनानंतर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

अमित खेडेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने आईचे निधन आणि तिच्या आठवणींबद्दल भाष्य केले आहे. सुनिता खेडेकर यांचे 15 मे 2024 रोजी कर्करोगाने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. 

अमित खेडेकरची पोस्ट

"हे सांगताना अत्यंत दु:ख होतं आहे की माझी आई, सौ. सुनिता खेडेकर 15 मे रोजी, रात्री १२.५० च्या सुमारास वयाच्या 60 व्या वर्षी जगातून कायमची निघून गेली आहे. ती गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होती. 

ती माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सर्वस्व होती. तिच्या निधनाने माझे पूर्ण कुटुंबीय दु:खाच्या छायेत आहेत. तिच्या जवळच्या लोकांच्या पलीकडे ही, माझ्या आईचा प्रेमळ प्रभाव आमच्या व्यापक समुदायावर पसरला आहे. ती नेहमी गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी, अडचणी ऐकून घेण्यासाठी, दु:खात गरजूंना खांदा देण्यासाठी तयार असायची. तिच्या दयाळूपणाच्या आणि उदारतेच्या नि:स्वार्थ कृत्यांनी अनेकांच्या जीवनाला स्पर्श केला आणि तिच्याबरोबर संपर्कात आलेल्या सर्वांवर एक अमिट छाप सोडली. 

खरंतर तिच्या नसण्याने आमच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे, त्याचे वर्णन शब्दात करु शकत नाही. या कठीण काळात आमच्यासोबत असलेल्या तुम्हा सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. तिच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना", असे अमित खेडेकरने म्हटले.

दरम्यान अमित खेडेकरच्या पोस्टवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कमेंट केली आहे. अमित हे ऐकून खूप दु:ख झाले. काळजी घे... भावपूर्ण श्रद्धांजली, असे सोनाली कुलकर्णीने म्हटले आहे. तर मंजिरी ओकने देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि तुम्हाला शक्ती असे म्हटले आहे. तर अनेक चाहत्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अशा कमेंट पोस्टखाली केल्या आहेत.