आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याने खरेदी केलं नवीन घरं, म्हणाला 'खरंच तारेवरची कसरत...'

नुकतंच त्याने युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

Updated: Feb 7, 2024, 05:27 PM IST
आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याने खरेदी केलं नवीन घरं, म्हणाला 'खरंच तारेवरची कसरत...'

Actor Amit Bhanushali New Home : मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या वर्षभरापासून अनेक मराठी कलाकारांनी हक्काचे घर खरेदी केले आहे. प्राजक्ता माळी, ऋतुजा बागवे, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, प्रसाद ओक, प्रसाद खांडेकर, सई ताम्हणकर, अक्षय केळकर या मराठी कलाकारांनी नवीन घरात प्रवेश केला आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओही त्यांनी शेअर केले आहेत. आता आणखी एका मराठी कलाकाराने नवीन घर खरेदी केले आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली आहे. 

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका लोकप्रिय आहे. या मालिकेत अर्जुन ही मुख्य भूमिका अभिनेता अमित भानुशाली साकारत आहे. या मालिकेमुळे तो प्रसिद्धीझोतात आला. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. अमित भानुशालीने नुकतंच युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अमितने काही दिवसांपूर्वीच नवीन घर खरेदी केलं आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडीओत त्याच्या नव्या घराची झलक दाखवली आहे. तसेच तो यात त्याच्या जुन्या घरातून नवीन घरात सामान शिफ्ट करत असल्याचे दिसत आहेत. यात तो सामानाचे शिफ्टींग करणाऱ्या कामगारांना मदतही करताना पाहायला मिळत आहे. 

"तुमचे आशीर्वाद असेच पाठिशी असू द्या"

यावेळी त्याने म्हटले, “आपलं संपूर्ण सामान नवीन घरात शिफ्ट करताना खरंच तारेवरची कसरत होते. पण हा सगळा ताण माझ्या लेकाचं ह्रिदानच एक हास्य पाहून निघून जातं. त्याला पाहिल्यावर मन प्रसन्न होतं. त्याच्यामुळे आमच्यामध्ये एक नवीन उर्जा निर्माण होते. लवकरच आम्ही नवीन घरात शिफ्ट होऊ. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद असेच आमच्या कुटुंबाच्या पाठीशी कायम असू द्या. सगळ्यांना भरभरून प्रेम!” 

दरम्यान अमितने या व्हिडीओत त्याच्या नवीन घराची छोटीशी झलकही दाखवली आहे. त्याची ही गुडन्यूज ऐकून सर्वजण त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत. त्याच्यावर कौतुकाचा वर्षावही करत आहेत. अमितच्या या व्हिडीओवर एका चाहत्याने "अभिनंदन अमित दादा, तुझी अशीच भरभराट होऊ दे. छान आहे फ्लॅट" असे म्हटले आहे. तर एकाने "खुप खूप शुभेच्छा नवीन घरासाठी आणि तुम्हाला असंच यश मिळत राहो, छोटा हनुमान खूप cute आहे", अशी कमेंट केली आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x