'गावरान मातीतलं नादखुळा त्रिकूट एकत्र', किरण मानेंकडून नव्या चित्रपटाची घोषणा

किरण माने यांनी नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांनी या चित्रपटाच्या शूटींगलाही सुरुवात केली आहे.

Updated: Jan 16, 2024, 09:27 PM IST
'गावरान मातीतलं नादखुळा त्रिकूट एकत्र', किरण मानेंकडून नव्या चित्रपटाची घोषणा title=

Kiran Mane New Flim : मराठी मालिका विश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे किरण माने. छोट्या पडद्यावरील मुलगी झाली हो या मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले. या मालिकेमुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ते बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात झळकली. आता सध्या ते ‘सिंधुताई माझी आई’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे किरण माने लवकरच एका चित्रपटात झळकणार आहेत. 

किरण माने यांनी नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. किरण माने यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात झाली आहे. यात त्यांनी चित्रपटाचे नाव सांगितलेले नाही. मात्र यात किरण माने यांच्याबरोबर देवमाणूस फेम अभिनेता किरण गायकवाड आणि सैराट फेम अभिनेता तानाजी गळगुंडे झळकणार आहे. 

किरण माने यांनी काय म्हटलंय?

"शॉट रेडी आहे किरणसर" असा आवाज आल्यावर कधी किरण मानेऐवजी किरण गायकवाड कॅमेर्‍यापुढं जाऊन उभा रहातो... तर कधी किरणसरांना टच अप करा म्हटल्यावर मेकअपमन गायकवाड ऐवजी मानेच्या चेहर्‍यावर पफ फिरवतो... असली मजा चाललीय. मागं खोड्या काढायला तानाजी गळगुंडे सारखा नग हायच... हे असं अस्सल गावरान मातीतलं नादखुळा त्रिकूट एकत्र आल्यावर धमाल मस्ती चालनारच भावांनो ! नविन भन्नाट सिनेमा, नविन जबराट भुमिका घेऊन येतोय... आत्ताशी शुटिंग सुरू झालंय... पोरं वांड हायेत. पयल्याच दिवशी झन्नाट गान्यावर लै नाचवलंय मला...पार पिट्टा पडलाय...पन मज्जा आली.  पिच्चर अभी बाकी है !, असे कॅप्शन किरण माने यांनी दिले आहे. 

किरण माने यांनी या पोस्टसोबतच काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोत किरण गायकवाड आणि तानाजी गळगुंडे हे एका ट्रॅक्टरवर उभे असल्याचे दिसत आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. या पोस्टखाली अनेक चाहत्यांनी अभिनंदन असे म्हटले आहे. तर काहींनी तुम्हाला आणि तुमच्या टीमला मनःपूर्वक शुभेच्छा अशी कमेंट केली आहे. 

दरम्यान किरण माने हे येत्या काळात अनेक चित्रपटात झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता रोहित मानेबरोबर फोटो पोस्ट केला होता. याद्वारे त्यांनी नवीन चित्रपट करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता त्यांनी आणखी एका नवीन चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केल्याचे सांगितले आहे. मात्र अद्याप त्यांनी या दोन्हीही चित्रपटांची नावे सांगितलेली नाहीत.