जेव्हा गोविंदा अभिनेत्रीसोबत हॉटेल रूममध्ये पकडला गेला! पत्नीने सोडलं होतं घर...

 गोविंदा हा कॉमेडीचा बादशाह आणि उत्कृष्ट अभिनेता मानला जातो. आज गोविंदाला कोण ओळखत नाही. अभिनेत्याचा चाहता वर्ग अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आहे. प्रत्येक वर्गात गोविंदाचा चाहता वर्ग आहे. आज अभिनेता गोविंदा 21 डिसेंबर रोजी आपला 60 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Updated: Dec 21, 2023, 07:47 PM IST
जेव्हा गोविंदा अभिनेत्रीसोबत हॉटेल रूममध्ये पकडला गेला! पत्नीने सोडलं होतं घर... title=

मुंबई : गोविंदा हा कॉमेडीचा बादशाह आणि उत्कृष्ट अभिनेता मानला जातो. आज गोविंदाला कोण ओळखत नाही. अभिनेत्याचा चाहता वर्ग अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आहे. प्रत्येक वर्गात गोविंदाचा चाहता वर्ग आहे. आज अभिनेता गोविंदा 21 डिसेंबर रोजी आपला 60 वा वाढदिवस साजरा करत आहे. गोविंदाने सुनीता आहुजासोबत लग्नगाठ बांधली आहे. पण त्याच्या आयुष्यात लग्नाआधी आणि नंतर अनेक मुली आल्या आणि गेल्या. त्याच्या अभिनयापासून ते त्याच्या अनोख्या डान्स स्टाईलप्रयंत, गोविंदाबद्दल सगळं काही पूर्णपणेच वेगळं आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच्या वाढदिवसानिमीत्त त्याच्याबद्दलची अशी एक गोष्ट सांगणार आहोत जी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल

एकीकडे प्रोफेशनल आयुष्यामुळे तो कायमच चर्चेत असतो पण हा अभिनेता जितका त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असतो तितकाच चर्चेत तो त्याच्या पर्सनल लाईफमुळेही असतो. अनेक सुंदर अभिनेत्रींसोबतच्या अफेअरमुळे हा सुपरस्टार सतत चर्चेत राहिला आणि काहींनी तर त्याचं वैवाहिक आयुष्यही हादरवलं होतं. आता अभिनेत्याबद्दल अशी एक चर्चा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, खरंतर, गोविंदा एकदा राणी मुखर्जीसोबत हॉटेलच्या खोलीत पकडला गेला होता. 

'इलजाम'मधील कोस्टार नीलम कोठारीसोबतच्या त्याच्या नात्यामुळे तो खूप चर्चेत होता. नीलम कोठारीवर त्याचं वेड्यासारखं प्रेम होतं. हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र फार कमी लोकांना हे माहिती आहे की,  एका हॉटेलमध्ये राणी मुखर्जीसोबत पकडला गेला होता.

गोविंदासोबत चित्रपट करण्यासाठी ती खूप उत्सुक होती. स्वित्झर्लंड आणि अमेरिकेसारख्या परदेशी लोकेशन्सवर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघंही चांगले मित्र बनले. वृत्तांनुसार, शूटिंगनंतर दोघंही एकमेकांच्या खूप जवळ आले होते. एवढंच नव्हेतर आऊटडोर लोकेशनवर हे दोघंही एकत्र राहत असल्याच्या चर्चा होत्या. यानंतर गोविंदा आणि राणीच्या अफेअरच्या बातम्या सर्वत्र पसरू लागल्या.  का प्रसिद्ध पत्रकाराने गोविंदाला हॉटेलच्या खोलीत राणीसोबत पकडलं. या बातमीने सगळीकडे खळबळ माजवली. ही बातमी ऐकून अभिनेत्याची पत्नी सुनीता आहुजाला मोठा धक्का बसला.

या संपुर्ण प्रकरणानंतर सुनीता आहुजाने गोविंदाचे घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि ती तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली. जशी वेळ निघून गेली तशी सुनितानेही गोविंदाला सुधरण्याची एक संधी दिली. यानंतर हे दोघं पुन्हा एकत्र आले. यानंतर जा दोघांचा सुखी संसार पुन्हा सुरु झाला. गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यात अनेक चढ-उतार आले आहेत, पण त्या काळातही त्यांनी आपलं लग्न वाचवलं आहे. दोघांना एक मुलगा यशवर्धन आणि मुलगी टीना अशी दोन मुलं आहेत.