मुंबई : अभिनेत्री मयुरी देशमुख मराठीसोबतच आता हिंदीत रुळू लागली आहे. 'इमली' या मालिकेतील तिच्या कामाचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे. 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून मयुरी देशमुख घराघरात पोहोचली. अभिनयासोबतच मयुरी तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आली आहे.
जुलै 2020 मध्ये मयुरी देशमुखचा नवरा अभिनेता आशुतोष भाकरेने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. '2020 हे वर्ष माझ्यासाठी कठीण होतं. पण एका वेळेला मी ते पूर्ण वर्ष एका दिवसासारखं मानलं. कारण मी ज्या गोष्टींचा सामना करत होते त्यातून बाहेर पडणं.'
एका मुलाखतीत मयुरी म्हणाली होती, ” मी आजही त्याच्यावर प्रेम करते आणि आजही तो माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. त्याच्या प्रेमासोबत मी एकटी राहू शकते. तो गेल्यानंतर मी काही मुलं दत्तक घेण्याचा विचार करतेय. मुलांसाठी दुसरं लग्न करण्याची काय आवश्यकता आहे?” असं ती म्हणाली होती.
या दु:खातून सावरत मयुरी परत एकदा खंबीरपणे उभी राहिली आहे. मयुरीनी लिहलेलं ‘डिअर आजो’ हे नाटक लवकरच विविध प्लॅटफॉर्मवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहे. तीन वर्षांपूर्वी मयुरीने हे नाटक लिहलं होतं. या नाटकात भारतातील आजोबा आणि अमेरिकेत वाढलेली नात यांच्यातील नातेसंबधावर भाष्य करण्यात आलं आहे. लेखक मयुरी देशमुख हिचं पहिलंच नाटक. ऐन विशीत लिहिलेलं. तिच्या परिपक्व विचारांचं दर्शन या नाटकात घडवतं.