close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर' सिनेमातील 'रोजगारिया' गाणं प्रदर्शित

मेरे प्राइम मिनिस्टर सिनेमातील दुसरे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. 'रोजगारिया' असे या गण्याचे नाव आहे. 

Updated: Mar 2, 2019, 02:10 PM IST
'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर' सिनेमातील 'रोजगारिया' गाणं प्रदर्शित

मुंबई : मेरे प्राइम मिनिस्टर सिनेमातील दुसरे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. 'रोजगारिया' असे या गण्याचे नाव आहे. गायक अरिजीत सिंगने हे गाणे गायले असून गण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी लिहले आहे. 'रोजगारिया' हे गाणे 8 वर्षांचा कन्हैया आणि त्याच्या मित्रांवर चित्रित करण्यात आला. मुंबईच्या रत्स्यांवर ही मुले बालमजू्री करताना दिसत आहे.

 

8 वर्षांचा मुलगा कन्हैया त्याच्या आईसोबत मुंबईच्या एका झोपडीत राहत आसतो.पण त्यांच्या सुखी आयुष्याला नजर लागते, त्याची आई शौचालयासाठी उघड्यावर गेली असता तिच्यावर विनयभंगाचा प्रसंग ओढावतो. त्यानंतर कन्हैया शौचालय बणवण्यासाठी पंतप्रधानांना एक पत्र लिहत विचारतो, तुमच्या आई सोबत असे झाले असते तर तुम्हाला कसे वाटले असते?

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री अंजली पाटील, मकरंद देशपांडे, रसीका अगाशे, सोनिया अल्बिजुरी आणि नचिकेत पूर्णापत्रे सिनेमात झळकणार आहेत.

'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर' सिनेमाची कल्पना राकेश ओमप्रकाश मेहरा यांना 'भाग मिल्खा भाग' सिनेमाच्या शूटिंग वेळेस आली. सिनेमाच्या शूटिंगचे शेवट झाल्यानंतर सकाळी 4 फिल्मसिटी जवळ असलेल्या झोपडीमध्ये फिरत असताना मोठ्या प्रमाणावर महिला शौचालयास गेल्या होत्या. तर 'मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर' सिनेमा 8 मार्च 2019 मध्ये प्रदर्शित होणार आहे.