आलिया-रणबीर पाठोपाठ प्रसिद्ध गायक अडकला लग्नबंधनात

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे.

Updated: Apr 17, 2022, 09:26 PM IST
आलिया-रणबीर पाठोपाठ प्रसिद्ध गायक अडकला लग्नबंधनात title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरु आहे. आलिया आणि रणबीर कपूर १४ एप्रिलला लग्नबंधनात अडकले आणि आता यामध्ये प्रसिद्ध गायक आणि रॅपर मिलिंद गाबाचं नावही सामील झालं आहे. पंजाबी गायक मिलिंद गाबाने त्याची गर्लफ्रेंड प्रिया बेनीवालसोबत लग्नगाठ बांधली आहे.

मिलिंद गाबाने गर्लफ्रेंडसोबत घेतली सप्तपदी
या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यावरून लोकांना नजर हटवणंही कठीण झालं आहे.

16 एप्रिल रोजी दिल्लीत हे कपल लग्नाच्या बेडीत अडकलं. आता मिलिंद आणि प्रियाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये मिलिंदने गोल्डन कलरची शेरवानी घातली आहे. तर दुसरीकडे, प्रिया लाल रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. दोघंही एकत्र खूप आनंदी दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मिलिंद आणि प्रियाचा लग्नसोहळा या आठवड्याच्या सुरुवातीला सुरू झाला या कार्यक्रमात भूषण कुमार, मिका, गुरु रंधावा, सपना चौधरी, सुरेश रैना, प्रिन्स नरुला आणि सुयश राय यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x