वय, वेळ आणि निळू भाऊ...; मिलिंद गवळीची 'ती' पोस्ट चर्चेत

Aai Kuthe Kay Karte Milind Gawali Post: मिलिंद गवळी हा अभिनेता कायमच चर्चेक असतो. इन्टाग्रामवरही तो आपल्या पोस्ट व्हायरल (Milind Gawali News) करत असतो. सध्या अशीच त्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. नक्की त्यानं त्याच्या पोस्टमध्ये (Milind Gawali Post) काय लिहिलं आहे? 

गायत्री हसबनीस | Updated: May 19, 2023, 07:50 PM IST
वय, वेळ आणि निळू भाऊ...; मिलिंद गवळीची 'ती' पोस्ट चर्चेत title=

Aai Kuthe Kay Karte Milind Gawali: सध्या आई कुठे काय करते या मालिकेमुळे अभिनेता मिलिंद गवळी चर्चेत आला आहे. तो आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून कायमच वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो. सध्या त्याच्या अशाच एका पोस्टनं सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. यावेळी त्यांच्या पोस्टकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. मिलिंद गवळी (Milind Gawali News) या मालिकेतील अनिरूद्धच्या भुमिकेसाठी ओळखला जातो यासाठी त्याचे कौतुकही केले जाते. परंतु मालिकेतील तोचतोचपणा पाहून मात्र मिलिंदला अनेकदा ट्रोलही केले जाते. सध्या मिलिंदची एक इन्टाग्राम पोस्ट चर्चेत आली आहे. नक्की या पोस्टमध्ये मिलिंदनं काय लिहिलंय? हे जाणून घेऊया या लेखातून. (milind gawali new post goes viral on instagram know what he says)

या पोस्टमधून मिलिंद गवळीनं (Milind Gawali in his post) लिहिलं आहे की, "आकर्षकपणे वयस्कर होणे. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि असं म्हणतात की वेळेतच सगळं व्हायला हवं, एकदा का वेळ निघून गेली की मग तुम्हाला काहीही करता येत नाही आणि दुर्दैव असं आहे की, खूप कमी लोकांना वेळेचं महत्त्व आहे. बऱ्याच लोकांना स्वत:च्याच तर नाहीच पण दुसऱ्याच्या वेळेची अजिबात किंमत नसते. खरंतर वेळ पाळणे आणि शिस्त हा वेगळा विषय आहे. याबद्दल नंतर लिहेल. पण आज ग्रेसफुली जगणं म्हणजे काय? याविषयी थोडं बोलावसं वाटतं". 

तो पुढे लिहितो की, "खूप लोकांना असं वाटतं की आपल्याकडे खूप वेळ आहे. पण खरंतर खूप वेळ कोणाकडेच नसतो. प्रत्येकाची वेळ ठरलेली असते. एक कलाकार म्हणून मी ज्यावेळेला माझ्या क्षेत्रातल्या काही लोकांकडे बघतो आणि मला त्या लोकांचं खूप कौतुक वाटतं. त्यांच्याकडे बघून छान वाटतं. आपण पण त्यांच्यासारखं व्हायला हवं किंवा त्यांचे काही गुण आपण घ्यायला हवेत असं सतत वाटत असतं". 

हेही वाचा - ऐश्वर्यानंतर कतरिनाच्या Airport Look नं चाहते हैराण; ट्रोल करत म्हणाले...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

केरळचे अभिनेते मोहनलाल यांच्याबद्दल तो लिहितो की, "केरळचे मोहनलाल यांच्याबरोबर मी केलं आहे. मला हा कलाकार फार ग्रेसफुली जगतो असं वाटतं. तसंच मी प्राण साहेबांबरोबर काम केलं होतं. ज्यावेळेला त्यांच्याबरोबर सिनेमा केला त्यावेळेला त्यांचं वय होतं 85. या वयात सुद्धा ते फार ग्रेसफुल होते. मी निळू भाऊ बरोबर ज्यावेळी काम केलं तेव्हा त्यांचं वय 77-78 होतं. त्यामुळे प्रेरणा घेण्यासाठी मला दुसरीकडे कुठे बघायची गरज नाही". सध्या त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स पाऊस पडाला आहे.