मिलिंद सोमणने केला साखरपुडा !!! पाहा फोटो

पुन्हा एकदा असंख्य तरूणींच हृदय तुटणार आहे. आणि त्याला कारण देखील तसंच आहे. वयाच्या 52 व्या वर्षी देखील तरूणींना आकर्षित करण्याची जादू ज्याकडे आहे असा मिलिंद सोमण लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. आपल्यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या अंकिता कोनवारसोबत मिलिंद सोमणने साखरपुडा केला आहे. मिलिंद सोमण अंकितावला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र आता ते दोघेही साखरपुडा करून अधिकृतरित्या नात्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे. 

Dakshata Thasale Updated: Apr 9, 2018, 12:11 PM IST
मिलिंद सोमणने केला साखरपुडा !!! पाहा फोटो  title=

मुंबई : पुन्हा एकदा असंख्य तरूणींच हृदय तुटणार आहे. आणि त्याला कारण देखील तसंच आहे. वयाच्या 52 व्या वर्षी देखील तरूणींना आकर्षित करण्याची जादू ज्याकडे आहे असा मिलिंद सोमण लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. आपल्यापेक्षा वयाने अर्ध्या असलेल्या अंकिता कोनवारसोबत मिलिंद सोमणने साखरपुडा केला आहे. मिलिंद सोमण अंकितावला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र आता ते दोघेही साखरपुडा करून अधिकृतरित्या नात्यात अडकल्याची माहिती मिळाली आहे. 

अंकिताच्या हातात ही गोड अंगठी 

 

I don't want to know what it's like to live without you, Don't want to know the other side of a world without you - #ruelle #forever #youandi #mylove

A post shared by Ankita Konwar (@earthy_5) on

मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार यांनी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अंकिताने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातात अंगठी दिसत आहे. त्यावरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, मिलिंद आणि अंकिताने साखरपुडा केला आहे. तसेच यात तिने मिलिंदचा हात पकडला आहे आणि तिच्या बोटात एन्गेज्डमेंट रिंग स्पष्ट दिसतेय. हा फोटो पाहून मिलिंद व अंकिताने साखरपुडा केल्याचा अंदाज बांधला जात आहे. मिलिंद काही महिन्यांपूर्वी अंकिताच्या गुवाहाटी येथील घरी गेला होता. अंकिताच्या भाच्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत तो सहभागी झाला होता. याच निमित्ताने मिलिंद अंकिताच्या पालकांना भेटला आणि अंकिताशी लग्न करण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. आधी अंकिताचे पालक वयाच्या अंतरावरून या लग्नासाठी राजी नव्हते. पण मिलिंदला प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्यांनी या लग्नाला होकार दिल्याचे कळतेयं. मिलिंदने त्यांना प्रचंड प्रभावित केल्याचेही समजतेयं. (स्पॅाट लाईट: 'पिंकथॉन' निमित्त मिलिंद सोमण आणि अणुषा दांडेकर सोबत खास बातचीत) 

मिलिंद सोमण आणि अर्ध्या वयाची गर्लफ्रेंड 

मिलिंद सोमण याचं वय 52 वर्षे असून त्याच्या पेक्षा अगदी अर्ध्या वयाची अंकिता कोनवार आहे. पण कुठेही त्यांच्या वयातील अंतर त्यांच्या नात्याच्या आड आलं नाही. अंकिता गुवाहाटी येथे राहणारी आहे. 2013 मध्ये ती एअर एशियाच्या केबिन क्रूचा भाह होती. अंकिता अंदाजे वय हे 23-24 वर्षे असू शकेल. अंकिताला हिंदी, बांगला, आसामी तसेच फ्रेंच आणि इंग्रजी इतक्या भाषा येतात. तिला सिनेमा पाहणे आणि स्विमिंग करणं अत्यंत आवडतं.