मिंलिद सोमण झळकणार ट्रांसजेंडरच्या भूमिकेत

पाहा लांब केस आणि मोठ्या टिकलीमध्ये कसा दिसतो मिलिंद   

Updated: Dec 24, 2020, 01:15 PM IST
मिंलिद सोमण झळकणार ट्रांसजेंडरच्या भूमिकेत  title=

मुंबई : मॉडेल आणि अभिनेता मिंलिद सोमनच्या चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगत असतात. आता मिलिंद एका खास अंदाजात चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ट्रांसजेंडरची भूमिका साकारत मिंलिद सोमन चाहत्यांच्या मनात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणार आहे. 'पौराशपूर' (Paurashpur)या सीरिजमध्ये राजाची भूमिका साकारण्यासाठी मिंलिदला विचारण्यात आलं होतं पण त्याने राजाची भूमिका नाकारून ट्रांसजेंडरची भूमिका साकारण्यास प्राधान्य दिलं.

Paurashpur में ‘ट्रांसजेंडर’मिलिंद सोमन के 'नोज़-रिंग और बिंदी' लुक ने मचाया गदर, काम वासनाओं से भरपूर है वेबसीरीज

'सर्वप्रथम मला राजाची भूमिका ऑफर करण्यात आली होती ,परंतु मी ही ऑफर नाकारली. कारण मला राजाची भूमिका साकारण्यात इच्छा नव्हती. त्यामुळे मी राजाची भूमिका नाकारून ट्रांसजेंडरची भूमिका करण्यास प्राधान्य दिलं ' अशी प्रतिक्रिया मिलिंद सोमणने दिली.   

महत्त्वाचं म्हणजे सीरिजमध्ये अभिनेत्री शिल्पा शिंदे देखील झळकणार आहे. सीरिजमध्ये ती राणी मीरीवती यांची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. शिवाय अनेक दिवसांनंतर ती अभिनय करताना दिसणार आहे.  'गँग्स ऑफ फिल्मिस्तान' (Gangs of Filmistan) या टीव्ही शोनंतर ती 'पौराशपूर' सीरिजमध्ये दिसणार आहे. 

महत्त्वाचं म्हणजे सीरिजमध्ये अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण आणि शिल्पा शिंदे शिवाय अन्नू कपूर (Annu Kapoor),शहीर शेख (Shaheer Sheikh) आणि फ्लोरा सैनी (Flora Saini) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  ही सीरिज लवकरच अल्ट बालाजी आणि झी 5वर प्रदर्शित होणार आहे.