Miss India 2023 खिताब पटकावणाऱ्या 19 वर्षीय Nandini Gupta विषयी 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

Nandini Gupta Miss India 2023 : नंदिनी गुप्ता यंदाच्या वर्षीची म्हणजेच 'फेमिना मिस इंडिया 2023' (Femina Miss India) ची विजेती ठरली आहे. आता नंदिनी भारताचे मिस युनिव्हर्समध्ये प्रतिनिधित्व करणार आहे. दरम्यान, नंदिनी नक्की कोण आहे ती काय करते तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया...

दिक्षा पाटील | Updated: Apr 16, 2023, 11:01 AM IST
Miss India 2023 खिताब पटकावणाऱ्या 19 वर्षीय Nandini Gupta विषयी 'या' गोष्टी तुम्हाला माहितीयेत का? title=
(Photo Credit : Femina Miss India Instagram)

Nandini Gupta Miss India 2023 : 'फेमिना मिस इंडिया 2023' (Femina Miss India) ची घोषणा झाली आहे. राजस्थानची नंदिनी गुप्तानं (nandini gupta) 'मिस इंडिया 2023' चा (Miss India 2023) खिताब जिंकला आहे. नंदिनीही राजस्थानमधील कोटाची राहणारी आहे. तिनं वयाच्या 19 व्या वर्षी मिस इंडियाचा खिताब जिंकला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीची श्रेया पुंजा आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर मणिपूरची थोनावजाम स्ट्रेला लुआंग आहे. मिस इंडिया 2023 चा ग्रॅंड फिनाले इंफाल मणिपुरमध्ये झाला होता. यावेळी पाहुणे म्हणून अनन्या पांडे, कार्तिक आर्यन आणि नेहा धूपिया देखीस दिसले होते. दरम्यान, नंदिनी विषयी बोलायचे झाले तर ती एक विद्यार्थीनी आहे. तिच्या विषयी आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

नंदिनी गुप्ताचं शालेय शिक्षण हे सेंट पॉल सीनियर सेकेंड्री आणि लाला लाजपत राय कॉलेजमधून झालं आहे. नंदिनी एक मॉडेल असून ती बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. नंदिनी लहाण असण्यापासून शाळेत असताना वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायची. नंदिनीसाठी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही आयडली होती. प्रियांकानं 2000 साली मिस वर्ल्डचा खिताब जिंकला होता. दरम्यान, प्रियांका तिची आयडल आहे असं नंदिनीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नंदिनी गुप्तानं ईटाम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की प्रियांकानं फक्त भारतात नाही तर परदेशातही आपल्या देशाचं नाव अभिमानानं उंचावलं आहे. नंदिनीला प्रियांकाचा सेंस ऑफ ह्यूमर आणि पर्सनॅलिटी खूप आवडते. दरम्यान, वयाच्या 10 वर्षापासून नंदिनीनं मिस इंडिया होण्याचे स्वप्न पाहिले होते. दरम्यान, मोठं झाल्यानंतर तिला कळलं की त्याहून पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत.   

नंदिनी गुप्ताला पुढे विचारण्यात आलं की तिच्याविषयी तिनं ऐकलीले एक अफवा ज्यानं तिला आश्चर्य झाले. टमाझ्या शरीर खूप केस आहेत जे उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. त्यामुळे लोक म्हणतात की मी माझी बॉडी ब्लीच करते. त्यामुळे ती गोरीसुद्धा दिसते', असं नंदिनीनं सांगितलं. नंदिनीला इंग्रजीभाषेत बोलण्यात अडचणी यायची. पण तिनं हार मानली नाही आणि सात महिन्यात इंग्रजी शिकली. 

हेही वाचा : शिल्पा शेट्टीला डेटवर घेऊन जाण्यासाठी निघालेला Salman Khan, वडिलांशी बोलायला गेला अन्...

फेमिना मिस इंडिया 2023 कार्यक्रमाविषयी बोलायचे झाले तर कार्यक्रमाच्या फिनालेमध्ये फॅशन आणि मनोरंजन विश्वातील अनेकांनी हजेरी लावली होती. तर अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री अनन्या पांडेनं (Ananya Panday) या कार्यक्रमात डान्स पर्फॉरमन्स केला होता.