बलात्काराच्या आरोपानंतर मिथुनच्या मुलाची 'चट मंगनी पट शादी'

आता अचानक त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत

Updated: Jul 11, 2018, 11:33 AM IST
बलात्काराच्या आरोपानंतर मिथुनच्या मुलाची 'चट मंगनी पट शादी' title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय मिमोह चक्रवर्ती गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. एका भोजपुरी अभिनेत्रीनं महाअक्षयवर बलात्काराचा आरोप केल्यामुळे तो वादात सापडला होता. परंतु, आता अचानक त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. महाअक्षयनं अभिनेत्री शीला डेव्हिड यांची मुलगा मदालसा शर्मा हिच्यासोबत 'चट मंगनी पट शादी' उरकून घेतलीय. खुद्द मिमोहनंच आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

Ladies and Gentleman ... Mr. and Mrs. Chakraborty. #marriage #married #marriedlife #marriagegoals #marriedcouple #love #lovely #lover #loved #family #joy #blessings #bliss #gratitude #grateful #beautiful

A post shared by Mahaakshay Mimoh Chakraborty (@mahaakshay) on

मिमोह - मदालसा गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. या दोघांचा विवाह उदीमध्ये अगदी साध्या पद्धतीनं पार पडला. या विवाहात जवळचे अगदी काही नातेवाईक सहभागी झाले होते.

मदालसा ही दक्षिणेकडील अभिनेत्री आहे. याशिवाय तिनं हिंदी, तेलुगू, कन्नड, तामिळ, जर्मन आणि पंजाबी सिनेमांत काम केलंय. मदालसाचे आई-वडीलही फिल्मी दुनियेशी निगडीत आहेत. मदालसा अभिनेत्री शीला शर्मा आणि डायरेक्टर सुभाष शर्मा यांची मुलगी आहे. मदालसा गणेश आचार्यच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'एंजेल' या सिनेमात दिसली होती. 

मिमोहवर एका भोजपुरी अभिनेत्रीनं शारीरिक शोषणाचा आरोप केला होता. महाअक्षयनं लग्नाचं वचन देत जवळपास चार वर्ष आपली फसवणूक करत बलात्कार केल्याचा आरोप या महिलेनं केला होता. या तक्रारीनंतर पोलिसांकडून एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात मिमोहसोबतच मिथुन चक्रवर्ती आणि पत्नी योगिता बाली यांच्यावरही एफआयआर नोंदवण्यात आलीय.