'नाळ' सिनेमातील 'चैत्या'चे तेलुगू सिनेमात पदार्पण

श्रीनिवास पोकळेचा नवा सिनेमा 

Updated: Nov 20, 2019, 11:47 AM IST
'नाळ' सिनेमातील 'चैत्या'चे तेलुगू सिनेमात पदार्पण title=

मुंबई : लोखंडाला परिस्पर्श झाला की, त्याचं सोनं होतं अगदी तसंच काहीस नागराजच्या (Nagraj Manjule) संपर्कात आलेल्या व्यक्तींच होतं. दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या सिनेमात काम केलेल्या नवोदित कलाकार किंवा कुणी बालकलाकाराचं आयुष्याचं सोनं होतं. 

असंच काहीस 'नाळ' (Naal) सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेला बालकलाकार 'चैत्या' म्हणजे श्रीनिवास पोकळेसोबत (Shrinivas Pokale) झालं आहे. 'चैत्या' आता तेलुगू (Telagu Film) सिनेमात झळकणार आहे. 'जॉर्ज रेड्डी' (George Reddy) असं या सिनेमाचं नाव आहे. श्रीनिवास या सिनेमातल्या मुख्य अभिनेत्याच्या बालपणीची भूमिका साकारणार आहे. सिनेमासाठी तो तेलुगू भाषाही थोडी-फार शिकला.

श्रीनिवासने या सिनेमाचा पोस्टर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये श्रीनिवास डोक्यावर पुस्तक घेऊन स्मितहास्य करताना दिसत आहे. श्रीनिवासचा निरागसपणा या फोटोतूनही दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#shripokale ,#marathifilm ,#marathiactors ,#chaitya ,#georgereddy ,#georgereddytrailer

A post shared by Shrinivas Pokale (@shri.pokale) on

श्रीनिवासचे 'नाळ'मधील सगळे डायलॉग लोकप्रिय आहे. 'नाळ' मधल्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता दाक्षिणात्य प्रेक्षकही त्याला पाहण्यासाठी उत्सुक असतील. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#chaitya ,#newfilm ,#upcomingmovies

A post shared by Shrinivas Pokale (@shri.pokale) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#shripokale ,#chaitya ,#naalmovie ,#marathiactors ,#childactors,#photoshoot

A post shared by Shrinivas Pokale (@shri.pokale) on

दिग्दर्शक नागराज मंजुळेसोबत काम करणारा हा दुसरा कलाकार आहे जो इतर भाषेत काम करत आहे. याअगोदर 'सैराट' सिनेमातील अभिनेत्री रिंकु राजगुरूने देखील तेलुगू सिनेमात काम केलं आहे. सैराटचा रिमेक केलेल्या सिनेमात आर्चीची भूमिका रिंकूनेच साकारली होती.